ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. २२ - बँकांचे जवळपास ९००० कोटी रुपयांचे कर्ज बूडवून पसार झालेल्या विजय मल्ल्यांनी बँकांसमोर नवा प्रस्ताव ठेवला आहे. विजय मल्ल्या यांनी 6868 कोटी भरण्यास तयार असल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. याअगोदर मल्ल्या यांनी सप्टेंबरपर्यंत ४००० करोड भरण्याचा ठेवलेला प्रस्ताव बँकांसमोर ठेवला होता. मात्र बँकांनी हा प्रस्ताव नाकारला होता. यानंतर विजय मल्ल्या यांनी आता अजून 2468 भरण्याची तयारी दर्शवली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने विजय मल्ल्या यांना भारतात कधी परतणार ? याबाबत विचारणाही केली. मात्र यावर मल्ल्यांकडून काहीच उत्तर देण्यात आलं नाही. किंगफिशरमध्ये 6107 कोटींचं नुकसान झालं असतानाही 6868 कोटी भरण्याचा हा प्रस्ताव माझ्याकडून सर्वोत्तम असल्याचं विजय मल्ल्या यांनी सांगितलं आहे.
किंगफिशर एअरलाईन्स, किंगपिशर फिनवेस्ट आणि युबीचे शेअर्स विकून 1591 कोटींची रक्कम सर्वोच्च न्यायालयात जमा करु शकतो अशी माहिती विजय मल्ल्या यांनी दिली आहे. कर्ज फेडण्यासाठी माझी तयारी आहे मात्र सरकारने पासपोर्ट रद्द करुन तसंच अजामीनपात्र वॉरंट जारी करुन माझ्यावर जबरदस्ती करु नये असंही विजय मल्ल्यांनी म्हटलं आहे.