शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

म्यानमार होतोय सोने तस्करीचा नवा मार्ग

By admin | Published: March 19, 2017 1:50 AM

दुबई, थायलंड, बांग्लादेश आणि नेपाळपाठोपाठ मुंबईत सोने तस्करीसाठी म्यानमार नवा मार्ग ठरत असल्याचे चित्र कस्टम विभागाने केलेल्या कारवाईतून समोर आले. गेल्या सात

मुंबई : दुबई, थायलंड, बांग्लादेश आणि नेपाळपाठोपाठ मुंबईत सोने तस्करीसाठी म्यानमार नवा मार्ग ठरत असल्याचे चित्र कस्टम विभागाने केलेल्या कारवाईतून समोर आले. गेल्या सात महिन्यांत कस्टम विभागाने म्यानमारमधून तस्करी करण्यात आलेले २४६ किलो सोने जप्त केले आहेत. पहिल्या सात महिन्यांत केलेली ही कारवाई आहे. म्यानमारमधून २४६ तर दुबईतून १५१ किलो सोने जप्त करण्यात आले आहे. २०१५ -१६ मध्ये १ हजार ४१७ किलो सोने दुबईतून जप्त करण्यात आले होते, तर २३२ किलो सोन्याची म्यानमारमधून तस्करी करण्यात आली होती. गेल्या वर्षाच्या तुलनेत हा आकडा झपाट्याने वाढलेला दिसून आला. म्यानमारच्या मनीपूर सीमेवरून मोठ्या प्रमाणात सोने तस्करीचा मार्ग अवलंबला जात आहे. मुळात या तस्करांच्या नियोजनबद्ध साखळीमुळे तस्करी वाढताना दिसते. यासाठी भूमार्गाचा वापर करत सीमा पार केल्या जातात. या वेळी गुवाहटी, सिलीगुडी मार्गाने येणारे सोने परदेशातच वितळविले जाते. त्यानंतर, मुंबई कोलकाता, चेन्नईमध्ये विमान किंवा रेल्वे मार्गाने त्याची तस्करी केली जाते. यात मान्यमारचा नवा मार्गाची भर पडली आहे. म्यानमारमध्ये सुरू असलेल्या बंडखोरीच्या चळवळीमुळे अवैधरीत्या सोने तस्करीत वाढत होत असल्याचा अंदाज कस्टम विभागाकडून वर्तविण्यात येत आहे. म्यानमार-बांग्लादेश सीमेवरून सहजपणे हे सोने कोलकातामध्ये आणले जाते. कोलकातात सोन्याच्या पारंपरिक दागिन्यांची मागणी अधिक असल्याने तस्करांचे फावते. त्यानंतर, हेच सोने मुंबईच्या बड्या मार्केटमध्ये येते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशात पहिल्या दहा महिन्यात तब्बल १.०२५ किलो सोने आर्थिक वर्षात जप्त केले आहे. बाजाराभावानुसार त्याची किंमत ३५० कोटी इतकी आहे. सोने तस्करीत सर्वात जास्त नफा या तस्करांना मिळतो. एका किलो मागे सर्व खर्च वगळल्यास तस्कराला ९० हजार ते १ लाखांपर्यंत रोख रक्कम मिळते.