नवी दिल्ली : तिकीट परत केल्यास विमान कंपन्या जास्तीचे शुल्क आकारत असल्याच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सरकार या शुल्काबाबत नवीन नियम तयार करीत आहे. नागरी उड्डयनमंत्री अशोक गजपती राजू यांनी येथे एका कार्यक्रमात ही माहिती दिली.येथे एका कार्यक्रमात भारतीय विमान प्राधिकरण (एआयए) राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ आणि राष्ट्रीय कौशल्य विकास कोष यांच्यात उड्डयन क्षेत्रातील कौशल्य विकासासाठी एक समझोता करण्यात आला. या कार्यक्रमाला अशोक गजपती राजू उपस्थित होते. त्यात त्यांनी ही माहिती दिली. याबाबत विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले की, ‘आम्ही अनेक सूचनांवर विचार करीत आहोत.’ विमानाचे तिकीट रद्द करण्यात आल्यास विमान कंपन्या मोठ्या प्रमाणावर शुल्क आकारत आहेत. याबाबत कोणते नियम करण्यात येत आहेत काय? असे विचारले असता, त्यांनी हे उत्तर दिले.दरम्यान, या मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले की, तिकीट रद्द करणे, बॅगेज आणि विमानात चढण्यास परवानगी नाकारणे याबाबत नवीन मापदंड निश्चित करण्यावर विचार सुरू आहे.
विमानांचे प्रवासाबाबत लवकरच नवे नियम
By admin | Published: June 09, 2016 5:29 AM