सरकारी संस्थाना मदत करण्यासाठी नवीन योजना - सहकारमंत्री महादेव नाईक व्ही.पी.के. माशेल शाखेचे नुतन वास्तूत स्थलांतर
By admin | Published: May 05, 2015 1:21 AM
कुंभारजुवे : राज्यातील विविध भागात असलेल्या डेअरी संस्थांमध्ये कमी पगारावर काम करीत असलेल्या कर्मचार्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी नवीन योजना तयार करण्यात आली असून ही योजना तीन टप्प्यात राबविली जाणार आहे. तसेच ५० वर्षे पूर्ण करणार्या सहकारी पतसंस्थांना दोन लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल, असे आश्वासन सहकारमंत्री महादेव नाईक यांनी माशेल येथे दिले. व्ही.पी.के. नागरी सहकारी पतसंस्थेच्या माशेल शाखेच्या नुतन वास्तूचे उद्घाटन प्रसंगी सहकारमंत्री श्री नाईक प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. त्याचंया हस्ते दीपप्रज्वलनाने नवीन वास्तूचे उद्घाटन करण्यात आले.
कुंभारजुवे : राज्यातील विविध भागात असलेल्या डेअरी संस्थांमध्ये कमी पगारावर काम करीत असलेल्या कर्मचार्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी नवीन योजना तयार करण्यात आली असून ही योजना तीन टप्प्यात राबविली जाणार आहे. तसेच ५० वर्षे पूर्ण करणार्या सहकारी पतसंस्थांना दोन लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल, असे आश्वासन सहकारमंत्री महादेव नाईक यांनी माशेल येथे दिले. व्ही.पी.के. नागरी सहकारी पतसंस्थेच्या माशेल शाखेच्या नुतन वास्तूचे उद्घाटन प्रसंगी सहकारमंत्री श्री नाईक प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. त्याचंया हस्ते दीपप्रज्वलनाने नवीन वास्तूचे उद्घाटन करण्यात आले. माशेल येथील कदंब बसस्थानकाजवळील कामत आर्केड इमारतीत व्ही.पी.के. माशेल इमारतीचे स्थलांतर करण्यात आले आहे. यावेळी सहकार निबंधक नारायण सावंत, व्ही.पी.के. चे चेअरमन डॉ. सुर्या गावडे, जिल्हा पंचायत सदस्या बबिता गावकर, स्थानिक सरपंच संकेत आमोणकर, पंचसदस्य ज्योस्ना शिरोडकर, प्रताप वळवईकर तसेच सुभाष हळर्णकर आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना सहकारमंत्री नाईक यांनी संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारीवर्ग व भागधारक यांच्या प्रयत्नामुळे व्हीपीकेने सहकार क्षेत्रात आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. हजारो गोमंतकीयांना नवी वाट दाखविली आहे. सहकार क्षेत्रातील अनेक बॅँकांना आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत मागे टाकले आहे. भागधारकांनाच्या विश्वासाा तडा जाईल अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टी सहकार क्षषत्रातील संस्थांनी करू नये. व्यवहार पारदर्शक असावा. कर्जाचे वितरण करताना नियमानुसार सावधगिरी बाळगण्याची नितांत आवश्यकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सहकार निबंधक सावंत यांनी बोलतान व्हीपीकेच्या सहकार क्षेत्रातील कार्याचे कौतुक केले व नुतन वास्तूत स्थलांतर करणार्या व्हीपीकेच्या शशखेला शुभेच्छा दिल्या. यावेळी चेअरमन डॉ. गावडे, तसेच अन्य उपस्थित मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. व्यवस्थापकीय संचालक अशोक गावडे यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान कार्यक्रमाचे औचित्य साधून सकाळी सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे संचालक, भागधारक, कर्मचारी, हितचिंतकांनी उपस्थित राहनू तीर्थप्रदासाचा लाभ घेतला. फोटो : व्ही.पी.के.च्या माशेल शाखेच्या नूतन वास्तूचे उद्घाटन करताना सहकारमंत्री महादेव नाईक. सोबत इतर मान्यवर. (छाया : नरसिंह प्रभू)