अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून वाहने चोरणारी टोळी सक्रीय चोरीचा नवा ट्रेंड : सॉफ्टवेअर इंजिनियरच्या मदतीने डॉक्टरची कार चोरल्याचा संशय
By admin | Published: July 09, 2016 11:50 PM
जळगाव: अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करुन नव्या कार व अन्य वाहने चोरणारी टोळी उत्तर महाराष्ट्रात सक्रीय झाली आहे. चोरलेल्या वाहनांचे पार्ट वेगळे करून मोठमोठ्या गॅरेजमध्ये त्याची विक्री केली जात असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. गुरुवारी रात्री रिंग रोडवरील डॉ.किशोर कमलसिंग पाटील यांची साडे सात लाखाची कार चोरी झाली, तेथेही हीच पध्दत वापरण्यात आली असून सॉफ्टवेअर इंजिनियरची त्यासाठी मदत घेतली गेल्याचा संशय आहे.
जळगाव: अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करुन नव्या कार व अन्य वाहने चोरणारी टोळी उत्तर महाराष्ट्रात सक्रीय झाली आहे. चोरलेल्या वाहनांचे पार्ट वेगळे करून मोठमोठ्या गॅरेजमध्ये त्याची विक्री केली जात असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. गुरुवारी रात्री रिंग रोडवरील डॉ.किशोर कमलसिंग पाटील यांची साडे सात लाखाची कार चोरी झाली, तेथेही हीच पध्दत वापरण्यात आली असून सॉफ्टवेअर इंजिनियरची त्यासाठी मदत घेतली गेल्याचा संशय आहे.बनावट किल्लीच्या माध्यमातून कार चोरी होणे शक्यच नसल्याचा दावा कंपनीने डॉक्टरांकडे केला आहे. या कंपनीच्या कारमध्ये इसीएम, इंजिन इन मोबिलायझेशन व अन्य एक अशा तीन यंत्रणा बसविण्यात आल्या आहेत. त्यामुळे बनावट किल्लीमुळे कदाचित कार सुरूही झाली तर शंभर मीटरच्या आत ती कार बंद पडते. स्वीचमध्ये एक चीप असते, ती बनावट किल्ली लगेच ओळखते, अशी माहिती कंपनीच्या अभियंत्यांकडून आपणाला मिळाल्याचे डॉ.पाटील म्हणाले.तीन दिवस आधी होते रेकीएखादे वाहन चोरी करायचे असेल तर चोरटे तीन दिवस आधी रेकी करतात. त्यानंतर त्या वाहनाचा नोंदणी व चेचीस क्रमांक मिळवतात. त्यानंतर संगणक, सॉफ्टवेअरचा वापर करून वाहन चोरी केली जाते. या प्रक्रियेत गोपनीय माहिती बाहेर जात असेल तर कंपनीतील एखाद्या व्यक्तीचा कुठेतरी संबंध येत असावा,अशी शंकाही उपस्थित होत आहे. गॅरेजमध्ये बदलतात गाड्याचोरी झालेल्या वाहनांचे प्रत्येक पार्ट वेगळे केले जातात. त्यातील इंजिन व चेचीस क्रमांक खोडला जातो. अपघात अथवा अन्य काही कारणाने भंगारात विक्री झालेल्या वाहनांचे आर.सी.बुक गॅरेज चालकांकडे असतेच. त्या वाहनाचा इंजिन व चेचीस क्रमांक जोडून चोरीच्या वाहनांना लावला जातो, शिवाय अधिकृत कागदपत्रे मिळत असल्याने वाहन घेणार्यालाही ते वाहन चोरीचे आहे अशी शंका येत नाही.कंपनीला पत्र देणारअंतर्गत सिस्टीम्स कमकुवत असल्यानेच कार चोरी झाल्यामुळे त्यात बदल करावा यासाठी कंपनीला पत्र देणार असल्याचे डॉ.किशोर पाटील यांनी सांगितले. सॉफ्टवेअरच्या माध्यमातून वाहन चोरी करण्याची पध्दत अनेक दिवसापासून आहे, मात्र जळगावात ती पहिल्यांदाच आली आहे. धुळे व नाशिक येथेही अशी पध्दत वापरण्यात आली आहे.