बंगळुरू : आयएएस अधिकारी डी. के. रवी यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास सीआयडीकडून सीबीआयकडे सोपविताना संवेदनशील असे पुरावे वगळल्याचा आरोप त्यांचे श्वशुर हनुमंथ्रायप्पा यांनी केल्याने आधीच वादग्रस्त ठरलेल्या या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.रवी यांच्या निवासस्थानी बसविण्यात आलेल्या डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डरमधील सीसीटीव्ही फुटेजचा संवेदनशील असे पुरावे ठरणारा भाग सीआयडीने वगळल्याच्या आरोपाने वादात भर पडली आहे. रवी यांच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासावरून वाढता जनक्षोभ पाहता मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोमवारी तपास सीबीआयकडे सोपविण्याची घोषणा केली होती. फोनवर कुणाशी बोलले?रवी हे दुसऱ्या बाजूला फोनवर असलेल्या व्यक्तीशी जोरजोरात बोलत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याचा दावा वृत्तपत्रांनी केला होता. त्या दिवशी सकाळी १०.३० वाजताचे फुटेज सीआयडीने का वगळले हे मला जाणून घ्यायचे आहे. डिलिट झालेला भाग पुन्हा मिळविण्याबाबत मी तंत्रज्ञांची मदत घेणार आहे. राज्य सरकार रवी यांच्या मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण देत असल्याचा संशय आहे काय? यावर ते म्हणाले की, सध्या तपास सुरू असल्याने त्यावर भाष्य करणार नाही. (वृत्तसंस्था)४रवी यांच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी सीआयडीने सीसीटीव्ही फुटेज मिळविले होते. २३ मार्च रोजी सीडी परत करताना त्यातील काही भाग वगळलेला बघून मला आश्चर्याचा धक्का बसला, असे काँग्रेसचे स्थानिक नेते असलेल्या हनुमंथ्रायप्पा यांनी सांगितले. ४रवी यांनी १६ मार्च रोजी कोरागंगला अपार्टमेंटमधील त्यांच्या निवासस्थानी सिलिंग फॅनला गळफास लावून आत्महत्या केली होती. त्या दिवशी सकाळी १०.३० वाजता रेकॉर्ड झालेले फुटेज सीडीमधून वगळण्यात आले आहे. वगळण्यात आलेला भाग मिळाला तरच मी त्याबाबत काही सांगू शकेल, असे ते म्हणाले.
रवी मृत्यू प्रकरणाला नवे वळण
By admin | Published: March 26, 2015 1:08 AM