नवी दिल्ली: देशात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. यादरम्यान, एका महिलेच्या कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची एक धक्कादायक घटना समोर आली होती.
थायलंडहून आलेल्या एका महिलेचा लखनौमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला होता. पोलिसांनी या महिलेवर अंत्यसंस्कार केले. मात्र प्राथमिक तपासामध्ये ही महिला कॉलगर्ल होती आणि तिला एका व्यावसायिकाने मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करून भारतात बोलावले होते, अशी माहिती समोर आली होती. दरम्यान या प्रकरणी काही नवीन धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. याप्रकणी काही बड्या नेत्यांवर आरोप केले जात असून पोलीस आतापर्यत 50 मोबाइल क्रमांकांची तपासणी करत आहेत.
10 दिवसांपूर्वी मृत युवतीला 7 लाख रुपये देऊन थायलँडवरून बोलवलं होतं. आता समाजवादी पक्षाच्या प्रवक्त्यांनी भाजपाचे राज्यसभा खासदार संजय सेठच्या मुलाने या युवतीला मौजमज्जा करण्यासाठी बोलवल्याचा आरोप समाजवादी पार्टीचे प्रवक्ते आयपी सिंह यांनी केला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास लखनौ पोलीस करत आहेत.
दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार ही कॉल गर्ल गेले तीन वर्षापासून लखनऊमध्ये येत होती असून ती शहरातील मोठ्या स्पा सेंटरमध्ये काम करायची. अनेक बडे नेते आणि व्यावसायिका तिच्या स्पा सेंटरमध्ये मसाजसाठी येत होते. त्यामुळे या प्रकरणी आणखी काही हायप्रोफाइल नावं समोर येण्याची शक्यता आहे. 3 मे रोजी या महिलेची तब्येत बिघडल्याने तिचा मृत्यू झाला होता, त्यामुळे प्रकरण आणखी चिघळलं आहे.
काय आहे प्रकरण?
काही दिवसांपूर्वी लखनौमध्ये एका व्यापाऱ्याने 7 लाख खर्च करून थायलँडवरून कॉलगर्ल बोलवल्याची बातमी समोर आली होती. 10 दिवसांपूर्वी या कॉलगर्लला लखनौला बोलावलं. त्यानंतर 2 दिवसांत ती कोरोना संक्रमणामुळे आजारी पडली. याची माहिती व्यावसायिकाने थायलँड एम्बेसीला दिली. त्यानंतर एम्बेसीच्या हस्तक्षेपानंतर कॉल गर्लला राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु 3 मे रोजी तिचा मृत्यू झाला होता.
थायलंडच्या दुतावासाने या महिलेच्या मृत्यू प्रमाणपत्राची मागणीही लखनौच्या प्रशासनाकडे केली आहे. लखनौच्या पोलिसांनी महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले आणि दुतावासाला माहिती दिली, असे विभूती खंड पोलीस ठाण्याचे प्रभारी चंद्र शेखर सिंह यांनी सांगितले. मात्र पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीमध्ये ही महिला कॉल गर्ल असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच यासर्वामागे इंटरनॅशनल सेक्स रॅकेट असण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याला कुणीही अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही.