शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटने वाढवली चिंता, केंद्राने राज्यांना दिले परदेशी प्रवाशांच्या कडक तपासणीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 8:29 AM

दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग आणि बोत्सवानामध्ये कोरोनाचा नवीन व्हेरिएंट सापडला आहे.

नवी दिल्ली: दक्षिण आफ्रिका(South Africa), हाँगकाँग (Hong Kong) आणि बोत्सवानामध्ये (Botswana) कोविड-19 चे नवीन व्हेरिएंट (Coronavirus New Variant) सापडल्यानंतर केंद्र सरकार अलर्ट झाले आहे. गुरुवारी केंद्राने सर्व राज्य सरकारांना परदेशातून विशेषतः या तीन देशांतून येणाऱ्या प्रवाशांची कडक तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) देखील या व्हेरिएंटवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. 

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना पत्र पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की, 'NCDC कडून अशी माहिती देण्यात आली आहे की, कोविड-19 चा नवीन व्हेरिएंट B.1.1529 ची बोत्सवानामध्ये 3, दक्षिण आफ्रिकेत 6 आणि हाँगकाँगमध्ये 1 रुग्णाची नोंद झाली आहे.' शास्त्रज्ञांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा नवा व्हेरिएंट मोठ्या प्रमाणात म्युटेशन करू शकतो.

भूषण पुढे म्हणाले की, या तीन देशांशिवाय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून जारी नियमावलीत इतर काही देशांमधून येणाऱ्या प्रवाशांवरही बारकाईने लक्ष देण्यास सांगितले आहे. MoHFW मार्गदर्शक तत्त्वांनुसार, या आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संपर्कांचा देखील बारकाईने मागोवा घेतला पाहिजे आणि त्यांची चाचणी केली पाहिजे, असे पत्रात म्हटले आहे. जीनोमिक सिक्वेन्सिंगमध्ये आतापर्यंत 10 प्रकरणांची पुष्टी झाली आहे. 

डॉ. टॉम पीकॉक, इम्पीरियल कॉलेज लंडनमधील विषाणूशास्त्रज्ञ, यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला त्यांच्या ट्विटर अकाउंटवर नवीन व्हेरिएंट (b.1.1.529)ची माहिती दिली होती. तेव्हापासून इथर शास्त्रज्ञही या नव्या व्हेरिएंटचा शोध घेत आहेत. प्रोफेसर एड्रियन पुरेन, NICD चे कार्यवाहक कार्यकारी संचालक म्हणतात की, 'दक्षिण आफ्रिकेत एक नवीन पॅटर्न सापडला आहे. आमचे तज्ञ नवीन पॅटर्न समजून घेण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहेत. लवकरच या व्हेरिएंटविषयी अधिक माहिती मिळेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतSouth Africaद. आफ्रिकाCorona vaccineकोरोनाची लसCentral Governmentकेंद्र सरकार