शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

Corona Virus :कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने वाढवलं टेन्शन; लस घेतलेल्यांनाही धोका?, जाणून घ्या, किती खतरनाक?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 12:48 PM

Corona Virus : जगासमोर नवीन आव्हानं येत आहेत. पुन्हा एकदा नवीन व्हेरिएंटने जगातील चार देशांमध्ये एन्ट्री केला आहे.

कोरोनाचा धोका संपलेला नाही. त्याचे नवनवीन व्हेरिएंट समोर येत आहेत. जगासमोर नवीन आव्हानं येत आहेत. पुन्हा एकदा नवीन व्हेरिएंटने जगातील चार देशांमध्ये एन्ट्री केला आहे. असं मानलं जातं की हा व्हेरिएंट अतिशय धोकादायक आहे. या नवीन व्हेरिएंटचे नाव BA.2.86 आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिका, ब्रिटन आणि इस्रायलमध्ये कोरोनाचा नवीन व्हेरिएंट BA.2.86 पैकी प्रत्येकी एक प्रकरण नोंदवलं गेलं आहे. त्याच वेळी, डेन्मार्कमध्ये या व्हेरिएंटची लागण झालेले तीन रुग्ण आढळले आहेत.

BA.2.86 ने 36 म्युटेशन दाखवले आहेत, जे ते सध्याच्या प्रभावी कोरोना व्हेरिएंट XBB.1.5 पेक्षा वेगळे करतात. कोरोनाचे हे नवीन व्हेरिएंट वेगाने पसरतात आणि लोकांना गंभीरपणे आजारी बनवतात याचा कोणताही पुरावा अद्याप मिळालेला नाही. परंतु नवीन व्हेरिएंटचा धोका लक्षात घेता, वैज्ञानिक आणि डॉक्टरांनी लोकांना कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास सांगितले आहे.

नवीन व्हेरिएंटवर लक्ष 

जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) महासंचालक डॉ. टेड्रोस एधानोम घेब्रेयसस यांनी कोविड-19 ही सध्या जागतिक आरोग्य आणीबाणी राहिलेली नाही, परंतु ती अजूनही धोकादायक परिस्थिती आहे. अलीकडेच, कोरोना व्हायरसचा एक नवीन व्हेरिएंट समोर आला आहे, ज्याचे स्वरूप अनेक वेळा बदललं आहे, BA.2.86 चे स्वरूप सध्या तपासले जात आहे, जे पुन्हा एकदा दर्शवते की सर्व देशांनी सतर्क राहण्याची गरज आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जर BA.2.86 व्हेरिएंटने धोकादायक स्वरूप धारण केलं, तर सध्याची लस नवीन व्हेरिएंटसाठी तितकी प्रभावी सिद्ध होणार नाही. ह्यूस्टन मेथोडिस्ट हॉस्पिटलच्या डायग्नोस्टिक मायक्रोबायोलॉजी विभागाचे संचालक डॉ. एस. वेसले लाँग यांच्या मते, हा व्हेरिएंट कोरोनाच्या सुरुवातीच्या व्हेरिएंटमधून आला आहे. म्हणूनच तो व्हेरिएंट हा या व्हेरिएंटपासून वेगळा आहे ज्याच्याशी लढण्यासाठी कोरोना लस बनवण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस