नवी दिल्ली: अरुणाचल प्रदेशातील वादग्रस्त सीमेवर चीनने नवीन गाव वसवलंल्याची माहिती समोर आली आहे. सॅटेलाइट इमेजमधून हा धक्कादायक खुलासा झालाय. मिळालेल्या माहितीनुसार, चीननेअरुणाचल प्रदेशमध्ये एक एन्क्लेव्ह तयार केला आहे, ज्यामध्ये किमान 60 इमारती आहेत. अरुणाचल प्रदेशच्या शि-योमी जिल्ह्यात बांधलेले चिनी एन्क्लेव्ह मार्च, 2019 आणि फेब्रुवारी, 2021 दरम्यान बांधले गेले आहे.
चीनने भारतीय भूमीवर बेकायदेशीर ताबा मिळवल्याचं भारताने कधीच मान्य केलेलं. तसेच, चीनकडून करणाऱ्यात येणाऱ्या दाव्यांचेही भारताडून अनेकदा खंडन करण्यात आलं आहे. पण, आता हाती आलेल्या माहितीनुसार, चीनने भारतीय भूमीत हे एन्क्लेव्ह तयार केले आहे. हे चीनेच दुसरे एन्क्लेव्ह भारतीय भूमीत सहा किलोमीटरच्या आत आहे आणि वास्तविक नियंत्रण रेषा (LAC) आणि आंतरराष्ट्रीय सीमा यांच्या दरम्यान असलेल्या भागात आहे.
इमारतीच्या छतावर ध्वज रंगवलाचीनने वसवलेले पहिले गाव हे दुसऱ्या एन्क्लेव्हच्या पश्चिमेस 93 किमी अंतरावर असलेल्या अप्पर सुबनसिरी जिल्ह्यातील त्सारी चू नदीच्या काठावर आहे. मॅक्सर टेक्नॉलॉजीज आणि प्लॅनेट लॅब या जगातील दोन आघाडीच्या सॅटेलाइट इमेज देणाऱ्या कंपनीने जारी केलेल्या छायाचित्रांमधून या नवीन एन्क्लेव्हची माहिती समोर आली आहे. अरुणाचल प्रदेशातील शि-योमी जिल्ह्यातील या चित्रांमध्ये केवळ डझनभर इमारतीच दिसत नाहीत, तर एका इमारतीच्या छतावर चिनी ध्वजही रंगवलेला दिसतोय. या विशाल ध्वजाच्या माध्यमातून चीन या भागावर आपला दावा मांडताना दिसत आहे.
गावाला चिनी नाव दिले
नवीन एन्क्लेव्हचे अचूक स्थान भारत सरकारची ऑनलाइन नकाशा सेवा भारतमॅप्सने स्पष्टपणे दर्शवले आहे. भारताचा हा डिजिटल नकाशा जो भारताच्या सर्वेयर जनरलच्या देखरेखीखाली काळजीपूर्वक तयार करण्यात आला आहे, हे देखील पुष्टी करतो की हे स्थान भारतीय हद्दीत आहे. सैन्य संघर्ष आणि संरक्षण धोरणाचे विश्लेषण आणि डेटा प्रदान करण्यासाठी मुख्य लष्करी विश्लेषक सिम टॅक यांच्या मते, हे गाव भारतीय हद्दीत आहे. दरम्यान, चीनने या गावाला चिनी नाव दिल्याचीही माहिती आहे. अद्याप यावर केंद्र सरकारकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण आलेलं नाही.