- सीमा महांगडे कोलकाता : आठ वर्षे वयाची असताना माझ्या डोळ्यांची दृष्टी गेली आणि माझ्या आयुष्यात अंधार पसरला. मात्र यामुळे मी माझ्या आयुष्यात कधीच हार मानली नाही आणि मागेही वळून पाहिले नसल्याची माहिती कंचन गाबा यांनी दिली. कोलकाता येथे आयोजित ५ व्या विज्ञान महोत्सवात महिला वैज्ञानिकांच्या परिषदेत त्या बोलत होत्या.अंध असूनही वकील असलेल्या कंचन गाबा या आता अंध मुलांच्या आयुष्याला नवीन दिशा देण्याचे काम करत असून अनेक शैक्षणिक, सामाजिक संस्थांच्या महिला सबलीकरण समितीच्या सदस्य आहेत. शुक्रवारी उद्घाटन करण्यात आलेल्या महिला वैज्ञानिक आणि उद्योजिका परिषदेच्या पहिल्या सत्रात आर्मी मेडिकल सर्व्हिसेसच्या मेजर जनरल माधुरी कानिटकर, निती आयोगाच्या सल्लागार डॉ. ना रे, कोलकाताच्या एस.एस.एन. बोस इन्स्टिट्यूटच्या वैज्ञानिक डॉ. तनुश्री सहा दासगुप्ता यांनी आपली उपस्थिती दर्शविली.डोळ्यांच्या पटलाला लागलेला मार व मोतीबिंदूही झाल्याने दुसरीत असतानाच कंचन यांना आपल्या दृष्टीला मुकावे लागले. मात्र, त्यांच्या आई वडिलांनी वर्षभर विविध ठिकाणी उपचार चालू ठेवले. अखेर त्यांना कोलकाताच्या अंध शाळेत दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांनी ब्रेल लिपी शिकण्यास सुरुवात केली. दहावीत असताना दिव्यांग वर्गात त्यांनी प्रावीण्य मिळविले. शैक्षणिक उपलब्धीसोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावर गर्ल्स मीटचे दोन वेळा प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना मिळाली. इतकेच नाही तर रिव्हर राफ्टिंगसाठी देशविदेशात त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त आहेत. पश्चिम बंगालमधील महिला कैद्यांच्या जीवनावरील प्रकल्पावर त्यांनी काम केले आहे. महिलांच्या मुद्द्यांमध्ये नेहमी मला संशोधन दिसले असून समाज आणि कायदा या विषयांमध्ये नेहमीच आवड असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.याच परिषदेच्या दुस-या सत्रात आलेल्या जिनिव्हाच्या नुक्लिअर रिसर्चसाठी प्रसिद्ध आॅर्गनायझेशन उएफठ मध्ये ३० वषार्हून अधिक वर्षे काम करणा-या अर्चना शर्मा यांचा प्रवासही परिषदेतील महिलांसाठी प्रेरणादायी ठरला. थमार्मीटर रीसेट कसा कार्यच या प्रश्नाचे उत्तर मॅग्नेटिक फिल्डच्या सहाय्याने हे ऊत्तर देऊन सातवीत असताना अर्चना यांनी आपल्या भौतिकशास्त्राच्या शिक्षिकेला प्रभावित केले आणि पुढील २ पीएचडीचा प्रवास , लग्नानंतरही जबाबदा-्या सांभाळून जिनिव्हा येथील आपले संशोधन आणि कायम ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली.
अंध असूनही जगाला दिली नवी दृष्टी; कंचन गाबा यांचा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 1:45 AM