मुंबई/नवी दिल्ली : ओमायक्रॉन कोरोनाचा संसर्ग राज्यात दिवसेंदिवस वाढत असल्याने सरकारने नवे निर्बंध घातले आहेत. या निर्बंधांचे पालन करीतच मुंबईसह राज्यभरातील नागरिकांनी सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे जल्लोषात स्वागत केले. संपूर्ण मुंबईत दरवर्षी नाताळ व नववर्षानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. परंतु यंदा तसा प्रकार मुंबईच काय इतर मोठ्या शहरांमध्येही दिसून आला नाही.
गर्दी जमेल असे कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यास बंदी घालण्यात आल्याने लोकांनी थर्टी फर्स्ट आपापल्या घरीच साजरा केला. कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी यंदाही स्वच्छ हात अन् तोंडावर मास्क, या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचा संकल्प केल्याचे चित्र दिसून आले. नव्या वर्षाचे स्वागत कऱण्यासाठी यंदा लोकांनी राज्यभरातील ठिकठिकाणची मंदिरे, पर्यटनस्थळे, समुद्रकिनारी अशा ठिकाणी गर्दी कोली. परंतु येथेही दरवर्षीप्रमाणे उत्साह दिसून आला नाही. गर्दी होऊ नये यासाठी पाेलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
भाविकांची गर्दीकोकणातील सर्वच समुद्रकिनाऱ्यांवर शुक्रवारी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. वॉटर स्पोर्ट्सचा आनंद लुटत किनाऱ्यावरील पाण्यात भिजण्याचा आनंद पर्यटक घेताना दिसले. नाशिकमध्ये नववर्षाच्या पूर्वसंध्येला त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्रावर भाविकांची गर्दी लोटली होती. येथे हजारो भाविक दाखल झाल्याने मंदिर परिसर गर्दीने फुलून गेला होता. शिर्डी, पंढरपूर येथेही भाविकांनी मोठी गर्दी केली होती.कोकण, गोवा, कर्नाटक, केरळ तसेच हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आदी राज्पांत या काळात लाखो देशी व परदेशी पर्यटक जात असतात. यंदाही या सवर्व ठिकाणी त्यांनी एकच गर्दी केली होती. पण देशातील प्रत्येक राज्याने कोरोनाचे कडक नियम लागू केल्याने त्यांच्यावर अनेक बंधने आल्याचे दिसत होते. हाॅटेलांत शिरताना व तेथून बाहेर पडताना लोकांनी मास्क लावले आहेत का, हे तपासले जात होते. मास्कविना कुठेही प्रवेश दिला जात नव्हता. एवढेच नव्हे, तर हाॅटेल चालकांनी बुकिंग करताना लसीकरणाची प्रमाणपत्रे मागून घेतली होती. याशिवाय ते प्रत्यक्ष आले, तेव्हाही त्यांची प्रमाणपत्रे तपासण्यात येत हाेती. त्यामुळे आनंदात मिळाचा खडा पडल्याची प्रेमळ तक्रार अनेकांनी केली.
गोव्यात दरवर्षी या काळात परदेशांतून लाखो लाक येत असतात. गोवा हे परदेशी मंडळींचे आवडीचे ठिकाणच असते. पण तिथेही अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे नेहमीप्रमाणे समुद्र किनारी फिरणारे लोकही खिशात लसीकरण झाल्याचे वा आपला आरटीपीसीआर अहवाल घेउन फिरत होते. यंदा महाराष्गोर्टाी लोकांनी गोव्यापेक्षा कोकणालाच अधिक पसंती दिल्याचे जाणवत होते. गोव्याला गेलेले अनेक जण तेथील मंदिरांतही दशर्शनासाठी जात असल्याचे दिसून आले.
उत्तर भारतात थंडीची लाट सुरू झाली आहे. त्यामुळे दक्षिणकेडील लोकांनी तिथे जायचे टाळले आणि आपले मावळते वर्ष जवळच्या राज्यांतमध्ये घालवण्याचा निणर्णय घेतला. मात्र पंजाब, मात्र पंजाब, दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगड येथील अनेकांनी नाताळ व मावळते वर्ष हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडामध्ये घालवले. तिथे उत्तर भारतीयांचीच अधिक गर्दी दिसत होती. मात्र कोरोनामुळे लोकांना हा रजेचा हक्काचा काळ आनंदात घालण्याच्या आड कोरोनाचा अडथळा येतच होता.
देशभर कोरोनामुळे आनंद कमी होत असला तरी तो संपलेला नाही, हे मात्र दिसून आले. मुलाबाळांसह हजारो लोक विविध पर्यटन स्थळी तसेच मंदिरे व अन्य प्रार्थना स्थळांकडे जाताना दिसत होते. सवर्व चर्चमध्ये ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री विशेष प्रार्थना आयोजित केल्या जातात. यंदा मात्र त्यााी आॉनलाइन झाल्या. घरात बसूनच लोक त्यात सहभागी झाले. तसेच मंदिरातील पूजाअर्चाही टीव्हीवर वा आॉनलाइन पद्धतीने पाहण्यातच भारतीय गुंगून गेले होते. पुढील वर्ष तरी विनाविघ्नाचे जावो, अशी त्यांची इच्छा दिसत होती.
अनेक ठिकाणी आकर्षक रोषणाई- अनेक ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनवर मुंबई पोलिसांची करडी नजर असल्यामुळे तरुणांनीदेखील मजा-मस्ती, धांगडधिंगा आणि पार्टीचा बेत रद्द केल्याचे दिसून आले. - मुंबईत संध्याकाळी ५ ते पहाटे ५ वाजेपर्यंत चौपाटी, सार्वजनिक स्थळ, गार्डन, मैदान, समुद्रकिनारी जाण्यास पोलिसांकडून बंदी घातली होती. त्यामुळे मरिन ड्राईव्ह, गेट वे ऑफ इंडियासह विविध ठिकाणी जल्लोष करण्यासाठी एकत्र जमलेल्या नागरिकांनी पोलिसांनी हुसकावून लावले. यामुळे काहींचा हिरमोड झाला. - महाबळेश्वर, माथेरान, कोल्हापूरच्या अंबाबाई, ताडोबासह राज्यातील सर्वच पर्यटनस्थळांवर पर्यटकांनी आगाऊ नोंदणी करत हॉटेल बुक केली होती. पर्यटकांनी हॉटेल तसेच हॉटेलबाहेरही पडताना गर्दीमध्ये न जाता कुटुंबांसह जल्लोष केला.