ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, 1 - गेल्या वर्षात भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग हा जगात सर्वाधिक होता, आता नव्या वर्षातही अर्थव्यस्थेच्या वाढीचा वेग कायम राहील, असा विश्वास केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला आहे.
नव्या वर्षांच्या सुरुवातीला प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जेटली यांनी नोटांबंदीसह विविध मुद्यांवर आपले मत मांडले. यावेळी जेटली म्हणाले, "नोटाबंदीनंतर मोठ्याप्रमाणावर रोकड बँकिंग सिस्टीममध्ये आली आहे. त्यात काळ्या पैशाचाही समावेश आहे. मोठ्या प्रमाणावर पैसा व्यवस्थेत आल्याने बँकांची कर्ज देण्याची क्षमता वाढणार आहे. गेल्या वर्षी भारताची अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात वेगावे वाढत असलेली अर्थव्यवस्था ठरली होती. आता नव्या वर्षातही ही वाढ कायम राहील." तसेच आगामी काळात महागाई नियंत्रणात ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी सांगितले.
India was one of the fastest growing economies last year and will continue to be so this year: FM Jaitley to ANI pic.twitter.com/QdKpYHgc0L— ANI (@ANI_news) 1 January 2017
We are now keeping the inflation under control, consequently we have seen interest rates coming down:FM Arun Jaitley— ANI (@ANI_news) 1 January 2017
त्याबरोबरच कॅशलेस अर्थव्यवस्था आणि जीएसटीचाही जेटली यांनी यावेळी उल्लेख केला. " कॅशलेस अर्थव्यवस्था आणि जीएसटीची अंमलबजावणी ही नव्या वर्षाची वैशिष्ट्ये ठरतील," असे जेटली म्हणाले.
I see 2017 as a year in which a combination of GST being implemented and a digitised economy will be future of India: FM Jaitley pic.twitter.com/8IlaYyWiFP— ANI (@ANI_news) 1 January 2017