Love Marriage and Drama: हल्लीच्या युगात प्रेम विवाह करणे ही फारशी मोठी गोष्ट नाही. पण बरेच वेळा प्रेम विवाहांमध्ये घरच्यांचा विरोध पत्करावा लागतो. अशा वेळी मुलगा-मुलगी पळून जाऊन लग्न करतात. पळून लग्न करणाऱ्या जोडप्यांबाबतही हल्ली लोकांना फारसं नवल वाटत नाही. पण पळून गेलेली मुलगी लग्न केल्यानंतर आधार कार्ड घेण्यासाठी घरी आली तर..... तुम्हाला ही एखादी कथा किंवा कहाणी वाटत असेल. पण असं खरंच घडलंय बिहारमधील आरा शहरात. तेथे एक विचित्र घटना घडली आणि त्याची आता चर्चा आहे.
आरा शहरातील आनंद नगरमध्ये राहणारी रजनी कुमारी (18 वर्षे) हिचे पटना जिल्ह्यातील शालीमपूर गावात राहणारे राजेंद्र (25 वर्षे) यांच्यासोबत राँग नंबरवर बोलत असताना तिचे प्रेम झाले. प्रकरण लग्नापर्यंत पोहोचले आणि दोघांनीही कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न केले. यानंतर दोघेही कुटुंबापासून वेगळे झाले आणि पाटण्यात राहू लागले. दरम्यान, मुलीला आधार कार्डाची गरज असल्याने तिने तिच्या आईकडे आधार कार्ड मागितले. यासाठी ती तिच्या आईला भेटायला आरा सदर रुग्णालयात पोहोचली. तिथेच आई आणि मुलीमध्ये वाद सुरू झाला आणि पुढे प्रकार खूपच वाढला. पण आईला आपल्या मुलीच्या प्रेमप्रकरणात ढवळाढवळ करणे कठीण गेले.
घरातून पळून गेलेल्या मुलीने प्रियकरासोबत लग्न केले होते. आधार कार्ड मागण्यासाठी आईकडे गेल्यावर आईने तिच्या या नात्याला विरोध केला असता, त्या मुलीने प्रियकराच्या साथीने आईला मारहाण करण्यास सुरुवात केली. प्रेमी युगुल आणि आई यांच्यातील हायव्होल्टेज ड्रामा पाहून घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. या दरम्यान आई आणि मुलगी दोघीही एकमेकांना शिवीगाळ करताना आणि एकमेकांवर धावून जाताना दिसल्या. त्याचवेळी या नाट्यानंतर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, नंतर स्थानिक लोकांनी प्रेमी युगुल आणि आईला कसे तरी शांत केले.
प्रियकर राजेंद्र म्हणाला की, त्यांचे प्रेमप्रकरण जवळपास वर्षभर सुरू आहे. दोघांनीही लग्न केले आहे. मैत्रिणीच्या आईलाही याची माहिती आहे आणि तिनेच तिला माझ्या घरी सोडले होते. आज जेव्हा आमची मैत्रीण तिच्या आईकडून आधार कार्ड घेण्यासाठी इथे आली तेव्हा तिच्या आईने आरडाओरडा करताना मारामारी सुरू केली. तर मुलीने याबाबत सांगितले की, ती स्वतःच्या इच्छेने लग्न करून तिच्या प्रियकरासोबत राहत आहे आणि तिला आता तिच्या माहेरच्या घरी जायचे नाही. मुलीच्या आईने मात्र सांगितले की, तिच्या मुलीने घराचे नाक कापले आहे, आता अशा मुलीला आम्ही ठेवू शकत नाही. तिने बाहेर वाटेल ते करावं. मी आता त्यांच्याशी संबंध ठेवणार नाही.