लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे देशातील स्थगित केलेली रेल्वेसेवा, येत्या १५ एप्रिलपासून सुरू करण्याचा विचार नसल्याचे; तसेच याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये झळकलेले वृत्त निराधार असल्याचे रेल्वे खात्याने स्पष्ट केले आहे.कोरोना साथीचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकारने लागू केलेल्या २१ दिवसांच्या टाळेबंदीची मुदत १४ एप्रिलला मध्यरात्रीनंतर संपत आहे. त्यामुळे या साथीचा फारसा प्रादुर्भाव नसलेल्या काही भागांत, तरी टाळेबंदी उठणार व तिथे रेल्वेसेवा सुरू होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या विषयाबाबत रेल्वे खात्याने म्हटले आहे की, सर्व परिस्थितीचे नीट अवलोकन करून, तसेच संबंधितांशी चर्चा केल्यानंतरच रेल्वेसेवा पुन्हा सुरू करण्याबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल. त्यामुळे अफवा व दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर जनतेने विश्वास ठेवू नये.
१५ एप्रिलपासून रेल्वेसेवा सुरू होण्याचे वृत्त खोटे; रेल्वे मंत्रालयाकडून स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 6:00 AM