- संतोष ठाकूरनवी दिल्ली : काश्मिरात दहा हजार लोकांनी आंदोलन केल्याचे वृत्त गृहमंत्रालयाने फेटाळले आहे. काश्मिरात असे कोणतेही आंदोलन झाले नसल्याचे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.केंद्रीय गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्या वसुधा गुप्ता यांनी सांगितले की, हे वृत्त एका विदेशी न्यूज एजन्सीने अगोदर दिले. त्यानंतर पाकिस्तानच्या वृत्तपत्राने हे वृत्त प्रकाशित केले की, श्रीनगरमध्ये दहा हजार लोकांनी निदर्शने केली. मात्र, हे वृत्त साफ खोटे आहे. त्या ठिकाणी काही किरकोळ निदर्शने झाली आहेत आणि यात सहभागी लोकांची संख्या वीसपेक्षा अधिक नव्हती.सरकारने जम्मू- काश्मिरात कलम १४४ लागू केले आहे. त्यामुळे एका जागेवर चारपेक्षा अधिक व्यक्ती एकत्रित येऊ शकत नाहीत. मात्र, शुक्रवारी नमाजासाठी काही तास यात सूट देण्यात आली होती. सर्व ठिकाणी शांततेत नमाज अदा करण्यात आली. काश्मिरात शांतता आहे.विदेशी एजन्सीने असे वृत्त दिले आहे की, महिला आणि मुलांना निदर्शने करताना रोखले आणि आईवा पुलावरून जाण्यास सांगितले. यातील काही जणांनी पाण्यात उड्या मारल्या. पाकिस्तानच्या वृत्तपत्राने हे वृत्त प्रकाशित केले आहे.
काश्मिरात आंदोलन केल्याचे वृत्त साफ खोटे, गृहमंत्रालयाचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 3:54 AM