नवी दिल्ली: सीबीआय (CBI) ने उत्तर प्रदेशातील 15,000 कोटी रुपयांच्या ‘बाइक बोट’ (bike boat scam)घोटाळ्याचा तपास आपल्या हाती घेतला आहे. या घोटाळ्यात बाइक टॅक्सीची सुविधा देण्याच्या नावाने सुमारे दोन लाख गुंतवणुकदारांकडून प्रत्येकी 62,100 रुपयांची फसवणूक झाली आहे. हा पंजाब नॅशनल बँकेच्या घोटाळ्यापेक्षाही मोठा घोटाळा असल्याची माहिती मिळत आहेत. या प्रकरणी सीबीआयने अनेकांविरोधात तक्रार दाखल करुन तपाससुरू केला आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की एफआयआरमध्ये, केंद्रीय अन्वेषण ब्युरो(CBI) ने उत्तर प्रदेश सरकारच्या पत्राची दखल घेतली आहे, ज्यामध्ये केंद्रीय एजन्सीला नोएडा पोलिसांनी डिसेंबर 2019 मध्ये दादरीमध्ये नोंदवलेल्या 11 एफआयआरची चौकशी करण्यास सांगितले आहे. हे पत्र कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने सीबीआयला या वर्षी सप्टेंबरमध्ये पाठवले होते. वस्तुस्थितीचा दाखला देत अधिकाऱ्याने सांगितले की, एजन्सीने बाइक बोटचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संजय भाटी आणि कंपनीतील इतर सहा अधिकाऱ्यांसह 15 जणांवर फसवणुकीचे आरोप आहेत. यांनी सुमारे दोन लोकांना बाइक बोट टॅक्सी देण्याचे आमिष दाखवत प्रत्येकाची 62,100 रुपयांची फसवणूक केली.
काय आहे बाइक बोट स्कॅम ?संजय भाटी नावाच्या व्यक्तीने 2010 मध्ये गरवीत इनोव्हेटिव्ह प्रमोटर्स लिमिटेड नावाने कंपनी स्थापन केली होती. यानंतर कंपनीकडून 2018 मध्ये बाइक बोट योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत बाइक टॅक्सी सुरू करण्यात आली. या अंतर्गत एका व्यक्तीकडून 62,100 रुपयांची एकरकमी गुंतवणूक करण्यात आली. त्याबदल्यात 1 वर्षापर्यंत 9765 रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले.
पैसे न दिल्याचा आरोपया स्कीममध्ये अनेकांनी आपले पैसे गुंतवले. पण, पैसे परत दिले नसल्याचा आरोप गुंतवणूक करणाऱ्यांनी केला आहे. यानंतर, संचालक फरार झाल्यावर लोकांनी तक्रारी नोंदवायला सुरुवात केली. दादरी कोतवाली परिसरातील कोट गावात बाइक बोटीचे मुख्य कार्यालय करण्यात आले. बाइक बोट घोटाळा उघडकीस आल्यानंतर गुंतवणूकदारांना लाखोंचे खोटे धनादेश दिले. मात्र बहुतांश लोकांचे चेक बाऊन्स झाले. पोलिसांनी काही लोकांवर गुन्हे दाखल केले नाहीत, यानंतर तर गुंतवणुकदारांनी थेट कोर्टात दाद मागितली.
गुंतवणूकदारांच्या पैशातून ही चॅनेल सुरू केले
मुख्य आरोपी संजय भाटी हा बसपाचा नेता आणि गौतम बुद्ध नगरचा लोकसभा प्रभारी होता. तसेच, यानेच ही स्कीम सुरू केली होती. तो सध्या तुरुंगात आहे. त्याचा साथीदार लखनऊचा रहिवासी बीएन तिवारी नोएडामध्ये राहून न्यूज चॅनल चालवायचा. त्याच चॅनेलवर बाइक बोटचा जोरदार प्रचार झाला होता. नोएडा ते लखनऊपर्यंतच्या अधिकाऱ्यांशी संबंध होते. चॅनेलचा उपयोग बाइक बोटच्या प्रचारासाठी केला जात असे. बाईक बोटमध्ये गुंतवलेल्या पैशातून वाहिनी सुरू करण्यात आली.
2 लाख सैनिकही बळी पडले
बाइक बोट टॅक्सी घोटाळ्यात दोन लाख सैनिक आणि सुमारे 6 लाख इतर नागरिकांची 15 हजार कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. या विरोधात देशभरात हजारो केसेस दाखल झाल्या आहेत. 24 हून अधिक आरोपी तुरुंगात आहेत. बाईक बोट या खासगी कंपनीने केलेल्या सुमारे 15 हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. या कंपनीने देशभरातील सुमारे 2 लाख लोकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या फसवणुकीप्रकरणी सीबीआयने कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटी यांच्यासह 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.