शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
2
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
3
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
4
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
5
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
6
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
7
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
8
जर CSK नं अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात MS धोनीला रिटेन केलं तर किती असेल त्याचं पॅकेज?
9
Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं
10
SL vs NZ 2nd Test: चला पुन्हा एक दिवस सुट्टीचा! परफेक्ट ड्युटीसह लंकेनं चौथ्या दिवशीच किवींचा खेळ केला खल्लास
11
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
12
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
13
'त्या' खेळाडूंवर बंदी घालायलाच हवी; नवीन नियमाचे इरफान पठाणकडून स्वागत; BCCI चे आभार!
14
पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!
15
"कुठलाही आजार वगैरे झालेला नाही"; सुशांत शेलारने सांगितलं वजन का आणि कसं कमी झालं!
16
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
18
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
19
धक्कादायक! गाडी नीट चालवायला सांगितली म्हणून पोलिसाची केली हत्या; दिल्लीतील घटना
20
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम

न्यूज चॅनेल्सना जबाबदारीचे भान नाही, सरन्यायाधीशांनी सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2022 8:42 AM

सरन्यायाधीश रमणा यांचे परखड मत; मुद्रित माध्यमांमध्ये जबाबदारीची जाणीव शिल्लक

रांची : माध्यमांकडून विशिष्ट अजेंडा डोळ्यासमोर ठेवून घडविल्या जाणाऱ्या चर्चा तसेच चालविली जाणारी समांतर न्यायालये (कांगारू कोर्ट्स) लोकशाहीसाठी घातक आहेत, असे परखड प्रतिपादन सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी शनिवारी केले. मुद्रित माध्यमांमध्ये अजूनही जबाबदारीची जाणीव शिल्लक आहे; पण इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये जबाबदारीची जाणीवच उरलेली नाही. ते जे दाखवितात, ते शेवटी हवेत विरून जाते, असेही ते म्हणाले. 

न्यायाधीश सत्यव्रत सिन्हा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रांची येथे आयोजिलेल्या व्याख्यानात रमणा म्हणाले की, मीडिया ट्रायल्समुळे न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य व निष्पक्षपणे काम करण्याची पद्धती यावर परिणाम होत आहे. माध्यमांनी व्यक्त केलेली मते ही खटल्याचा निकाल देण्यासाठी मार्गदर्शक घटक ठरू शकत नाहीत. माध्यमे चालवत असलेल्या समांतर न्यायालयांमुळे न्यायाधीशांनाही निर्णय घेणे कठीण जाते.

कडक नियम गरजेचेमाध्यमांकडून काही गोष्टींचे वारंवार होणारे उल्लंघन व सामाजिक अशांतता हे मुद्दे लक्षात घेता माध्यमांवरील जबाबदारी निश्चित करण्यासाठी काही कडक नियम करण्याची आवश्यकता आहे.         - एन. व्ही. रमणा, सरन्यायाधीश

‘निवृत्तीनंतर न्यायाधीशांना सुरक्षा का नाही?’सरन्यायाधीश म्हणाले की, जे न्यायाधीश गुन्हेगारांना तुरुंगात पाठवितात, ते निवृत्तीनंतर सर्व संरक्षण गमावून बसतात. ज्या समाजात गुन्हेगारांना शिक्षा फर्मावलेली असते तिथेच त्यांना सुरक्षिततेच्या हमीशिवाय राहावे लागते. नेते, नोकरशहांचे काम अत्यंत संवेदनशील स्वरूपाचे असते. त्यांना निवृत्तीनंतरही सुरक्षा पुरवण्यात येते; मात्र अशी सुरक्षा न्यायाधीशांना देण्यात येत नाही.

टॅग्स :Mediaमाध्यमेSupreme Courtसर्वोच्च न्यायालय