काबूलमधल्या विदेशी सैनिकांनी व नागरिकांनी गजबजलेल्या अशा व्यापारी भागामध्ये ३० जूनरोजी दहशतवाद्यांनी स्फोट घडवला असून ४ जण ठार झाले तर अनेक जण जखमी झाले आहेत. अफगाणिस्तानात इस्लामिक स्टेटनेही शिरकाव केला असून अफगाणिस्तान पुन्हा दहशतवादात होरपळण्याची भीती आहे. (फोटो सौजन्य - ANI)
आरके नगर येथून विधानसभेच्या पोटनिवडणुकीत जयललिता यांनी एक लाखापेक्षा जास्त मतांनी विजय मिळवत तामिळनाडूमध्ये आपलं वर्चस्व असल्याचं पुन्हा दाखवून दिलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बेटी बचाओ बेटी पढाओचा नारा दिला त्याबद्दल त्यांचे कौतुकही झाले. परंतु सध्या केंद्रासह विविध राज्यांमधील भाजपाशासित सरकारवर घोटाळ्यांपासून ते अनैतिक आचारांसंदर्भात होत असलेल्या आरोपांबाबत मोदींनी पाळलेल्या मौनामुळे त्यांच्यावर टीकाही होत आहे.
विनोद तावडेंनी १९१ कोटी रुपयांची अग्निशमन उपकरणांची खरेदी नियमबाह्य पद्धतीने केली असे आरोप झाले असून भाजपाच्या सगळ्या मंत्र्यांनी मात्र तावडेंची पाठराखण केली आहे. कुठलाही घोटाळा झाला नसून हे षडयंत्र असल्याचा आरोप अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.
अमेरिकेने समलैंगिक विवाहांना मान्यता दिल्यानंतर भारतातही समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणारे ३७७ कलम रद्द होऊ शकते असे उद्गार कायदा मंत्री सदानंद गौडा यांनी काढले आहेत.
सुनंदा पुष्कर यांच्या गूढ मृत्यूप्रकरणी त्यांचे पती व काँग्रेस नेते शशी थरूर यांची पॉलीग्राफी व लाय डिटेक्टर टेस्ट करण्याची परवानगी दिल्ली पोलीस मागण्याची शक्यता असल्याचे वृत्त आहे.
काळविट हत्येप्रकरणी सलमान खानच्या विरोधात साक्ष असलेले प्रमुख साक्षीदार चोगराम हे मानसिकरीत्या सक्षम नसल्याचे त्यांच्या मुलानेच सांगितले असून न्यायालयाने वैद्यकीय अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
ज्वाला गुट्टा आणि आश्विनी पोनप्पा या भारतीय जोडीने येथे ५० हजार डॉलर बक्षीस रकमेच्या कॅनडा ओपन ग्रांप्रीच्या निर्णायक लढतीत इफ्जे मुस्केरन्स आणि सेलेना पीक या डच जोडीला सरळ सेट्समध्ये पराभूत करताना महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले.
बांग्लादेशमधल्या मानहानीकारक पराभवानंतर ढोणीसह प्रमुख खेळाडुंना विश्रांती देण्याचा निर्णय निवडसमितीने घेतला असून अजिंक्य रहाणेच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ घालण्यात आली आहे.
प्रमुख भारतीय खेळाडुंचे अर्धमुंडन केलेला फोटो प्रोथोम आलो या बांग्लादेशी वृत्तपत्राने प्रथम पानावर छापून भारतीय क्रिकेट टीमच्या जखमेवर मीठ चोळले आहे.