पुढच्या निवडणुकीत गुजरातमध्ये काँग्रेस 135 जागा जिंकेल - राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2017 07:38 PM2017-12-23T19:38:59+5:302017-12-23T19:43:19+5:30
गुजरात दौ-यावर आलेल्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी गुजरात निवडणुकीत भाजपाला कडवी टक्कर दिल्याबद्दल कार्यकर्त्यांचे कौतुक केले.
अहमदाबाद - गुजरात दौ-यावर आलेल्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी गुजरात निवडणुकीत भाजपाला कडवी टक्कर दिल्याबद्दल कार्यकर्त्यांचे कौतुक केले. गुजरातमध्ये पुढचे सरकार काँग्रेस स्थापन करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या निवडणुकीत गुजरातमध्ये नवीन नेतृत्व उदयाला येत असल्याचे दिसले. राज्यात पुढचे सरकार आपले असेल असे त्यांनी सांगितले. पुढच्या निवडणुकीत गुजरातमध्ये आपण 135 जागा जिंकू असे राहुल म्हणाले.
Let me assure you, in the next Gujarat elections we will win 135 seats. In the meantime, you will not retreat. You will not give an inch. You will counter the BJP: Congress President Rahul Gandhi #ThankYouGujarat
— Congress (@INCIndia) December 23, 2017
निवडणुकीच्या काळात पक्षातील काही जणांनी पक्षाविरोधात जाऊन काम केले. त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. 90 टक्के लोकांनी एकत्रितपणे पक्षाच्या विजयासाठी प्रयत्न केले पण 5 ते 10 टक्के लोकांनी सहकार्य केले नाही. पक्ष त्यांच्यावर निश्चित कारवाई करेल असे राहुल म्हणाले. काँग्रेस पक्ष एकत्रितपणे उभा राहतो तेव्हा पराभव होत नाही. निवडणुकीत आपला पराभव झाला असला तरी आपण जिंकलो. ते रागाने निवडणूक लढले त्यांच्याकडे सगळी साधने होती. पण आपण सत्याने, प्रेमाने निवडणूक लढलो असे राहुल म्हणाले.
Let me tell you about the reasons for our defeat. In the last 20 years, the BJP and Mr Modi have run a campaign of defamation against Congress party workers and leaders: Congress President Rahul Gandhi #ThankYouGujarat
— Congress (@INCIndia) December 23, 2017
भाजपाच्या आकस, द्वेषपूर्ण प्रचारामुळे पराभव झाला असे राहुल यांनी सांगितले. मागच्या वीस वर्षात भाजपा आणि मोदींनी काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांच्या विरोधात राबवलेली बदनामीची मोहिम हे काँग्रेसच्या पराभवामागचे कारण आहे असे राहुल म्हणाले. भाषणाच्या शेवटी राहुल यांनी विजयाबद्दल भाजपाचे अभिनंदन करताना पुढची पाचवर्ष काँग्रेस सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावेल असे सांगितले.