ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 21 - नीटची परीक्षा आता मराठीसह इतर आठ भाषांमध्ये होणार आहे. वैद्यकीय प्रवेशासाठीची राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात नीट ही इंग्रजीसोबतच इतर भाषांमध्ये देण्यात यावी अशी मागणी गेल्या काही काळापासून करण्यात येत होती. अखेर केंद्र सरकारकडून त्या मागणीस मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे नीटची परीक्षा आता मराठीसह हिंदी, इंग्रजी, आसामी, तामिळ, गुजराती, बंगाली आणी तेलुगू भाषांमध्येही होणार आहे. 2017-18पासून ही परीक्षा या भाषांमध्ये होणार आहे.
मात्र ‘नीट’ची परीक्षा प्रादेशिक भाषांमध्ये सुरू केल्यास पेपर फुटण्याची भीती काहीजणांकडून व्यक्त करण्यात येत होती. इंग्रजी वगळता इतर भाषांमध्ये पुस्तके उपलब्ध नसल्याने हा पर्याय चूक असल्याचेही अनेकांचे म्हणणे होते.