नवी दिल्ली - योगगुरु बाबा रामदेव यांनी पुढची 10 ते 20 वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय नाही असं म्हटलं आहे. मी मोदींचा भक्त नाही पण एक राष्ट्रभक्त नक्कीच आहे. एवढंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील राष्ट्रभक्त आहे. त्यामुळे पुढची 10 ते 20 वर्षे त्यांना पर्याय नाही असं बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. रामदेव बाबा यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि दिग्विजय सिंह यांना सल्ला देखील दिला आहे. राहुल गांधी यांनी त्रियोग करावा तर दिग्विजय सिंह यांनी मौन योग करावा असं त्यांनी म्हटलं आहे.
रामदेव बाबा यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत असं म्हटलं आहे. देशात मोदी फॅक्टर आहे का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता त्यावर "कोट्यवधी लोकांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास आहे. त्यांच्यात आणि इतर राजकारण्यांमध्ये खूप मोठा फरक आहे. संपूर्ण देशाला हे माहीत आहे की मोदींना स्वतःसाठी काहीही नको आहे जे काही करायचं आहे ते देशासाठी करायचं आहे. देवाच्या कृपेने त्यांना हे सर्व काही मिळालं आहे" असं उत्तर दिलं आहे.
"मी मोदीभक्त नाही तर राष्ट्रभक्त"
लोकशाहीत सध्या सर्वत जास्त विश्वास कोणावर आहे असं विचारलं असता भारताच्या राजकारणात सध्या पुढच्या 10 ते 20 वर्षांसाठी तरी मला मोदींना कोणताही पर्याय आहे असं दिसत नाही असं म्हटलं आहे. तुम्ही मोदी भक्त आहात असा आरोप तुमच्यावर सतत होत असतो असं जेव्हा बाबा रामदेव यांना विचारण्यात आलं तेव्हा मी मोदीभक्त नाही तर राष्ट्रभक्त आहे. मी प्रभू, गाव, गरीब, मजूर, शेतकरी, दलित, शोषित, वंचित, मागासवर्गीय यांचा भक्त आहे. मी योगी आहे आणि कर्मयोगी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रभक्त आहेत त्यामुळे मी त्यांचा सहयोगी आहे असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
रामदेव बाबांच्या पतंजलीने "कोरोनिल"च्या विक्रीतून केली बक्कळ कमाई; फक्त 4 महिन्यांत तब्बल 241 कोटी
रामदेव यांच्या 'पतंजली' समूहाने कोविड-19 आजारावर 'कोरोनिल' या आयुर्वेदिक औषधाची घोषणा केली होती. लाँचिंगपासूनच 'कोरोनिल' वादाच्या भोवऱ्यात सापडलं. यानंतर आता कोरोनिलच्या विक्रीतून पतंजलीने बक्कळ कमाई केल्याची माहिती समोर आली आहे. रामदेव बाबा यांच्या पतंजलीने फक्त चार महिन्यांच्या कालावधीमध्ये 85 लाखांहून अधिक कोरोनिल किट विकले आहेत. कंपनीने दिलेल्या आकडेवारीनुसार, चार महिन्यांच्या कालावधीमध्ये कंपनीने कोरोनिल विकून तब्बल 241 कोटी कमावले आहेत.