शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

उद्या शुक्रवार, सोमवारी ईद; काश्मीरसाठी पुढचा आठवडा महत्त्वाचा 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2019 2:54 PM

जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवून या राज्याचे विभाजन विभाजन करण्याची घोषणा झाल्यापासून काश्मीरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे.

श्रीनगर - जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवून या राज्याचे विभाजन विभाजन करण्याची घोषणा झाल्यापासून काश्मीरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. राज्यातील बहुतांश भागात संचारबंदी लागू असून, शुक्रवारपासून पुढचा आठवडा काश्मीरमधील सुरक्षाव्यवस्था आणि शांततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शुक्रवारची नमाज आणि सोमवारी बकरी ईद असल्याने संचारबंदी काही काळासाठी शिथील करण्यात येणार आहे. मात्र या काळात कलम ३७० हटवण्याबाबत काश्मिरींच्या जनमानसाचा अंदाज येणार आहे. दरम्यान, राज्यात शांतता कायम राखण्यासाठी सुरक्षा दलांनी सुद्धा चोख रणनीती आखलेली आहे. शुक्रवार ९ ऑगस्ट ते 15 ऑगस्टदरम्यान जम्मू -काश्मीरमध्ये पाच मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन होणार आहेत. त्यामुळे कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर या काळात काश्मीर खोऱ्यात काय परिस्थिती राहील. यावर सुरक्षा यंत्रणा आणि केंद्र सरकारची करडी नजर आहे.  ९ ऑगस्ट रोजी छोडो भारत आंदोलनाचा वर्धापन दिन आहे, त्याच दिवशी शुक्रवारची नमाज असेल. त्यानंतर १२ ऑगस्ट रोजी बकरी ईद आहे. तसेच १४ ऑगस्टला पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन असून, त्यानिमित्त १३ ऑगस्ट रोजी पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतविरोधी कार्यक्रमांचे आयोजन होत असते. या दिवशी काश्मीर खोऱ्यात पाकिस्तानचा झेंडा फडकवण्याचाही प्रयत्न होत असतो. 

 बकरी ईदपूर्वी हज यात्रेहून परतलेल्या यात्रेकरूंच्या सन्मानार्थ कार्यक्रमाचे आयोजनही होत असते. त्यातच काश्मीर खोरे हे मुस्लिम बहूल असल्याने या ठिकाणी बकरी ईद हा  मोठा सण असतो. त्यामुळे तणावाच्या पार्श्वभूमीवर या सणानिमित्त बाजार उघडणार की बंद राहणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.  तर १४ ऑगस्ट हा पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन असून, यादिवशी स्वातंत्र्याचा जल्लोष काश्मिरी जनतेसह साजरा करण्याची घोषणा पाकिस्तानने केली आहे. तर १५ ऑगस्ट रोजी काश्मीरमधील सर्व ४ हजार पंचायती आणि गावांमध्ये तिरंगा फडकवण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. कलम ३७० रद्द झाल्याने जम्मू काश्मीरचा वेगळा ध्यज आता अस्तित्वात राहणार नाही. मात्र श्रीनगर येथील सचिवालयावर बुधवारीसुद्धा तिरंग्यासह राज्याचा ध्वज फडकत होता. हा ध्वज १३ जुलै १९३१ पासून फडकवला जात आहे.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370Central Governmentकेंद्र सरकारIndiaभारत