नवी दिल्ली : पुढीलवर्षी प्रजासत्ताक दिनाचे संचलन दिल्लीतील ‘सेंट्रल व्हिस्टा एव्हेन्यू’ या नव्या मार्गावर हाेणार आहे. केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी ‘सेंट्रल व्हिस्टा एव्हेन्यू’च्या विकास कामाचे भूमिपूजन केले, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाचे संचलन राजपथवर हाेते. हा भाग असलेला नाॅर्थ ते साऊथ ब्लाॅकपर्यंतचा भाग ‘सेंट्रल व्हिस्टा एव्हेन्यू’मध्ये अंतर्भूत करण्यात आला आहे. राजपथ,लगतची हिरवळ, झाडे, विजय चाैक, इंडिया गेट प्लाझा या परिसराचा सेंट्रल व्हिस्टामध्ये समावेश हाेताे. या संपूर्ण भागाचे रुपडे पालटणार आहे. दिल्लीत सर्वाधिक पर्यटक सेंट्रल व्हिस्टा परिसराला भेट देतात. संसदेची नवी इमारतही सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास प्रकल्पात परिकल्पित आहे. विविध केंद्रीय कार्यालयांसाठीदेखील या परिसरात जागा उपलब्ध हाेणार आहे. हा एकूण १२ हजार ८७९ काेटी रुपयांचा प्रकल्प आहे. सरकारी कार्यालयांना जागा मिळाल्यामुळे, सरकारच्या दरवर्षी भाड्यापाेटी खर्च हाेणाऱ्या १ हजार काेटी रुपयांची बचत हाेणार आहे.
पुढीलवर्षी प्रजासत्ताक दिनाचे संचलन ‘सेंट्रल व्हिस्टा एव्हेन्यू’वर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2021 3:59 PM