NIA operation demolish: राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) गुंड आणि खलिस्तानी नेटवर्कचा नायनाट करण्यासाठी ऑपरेशन डिमॉलिश सुरू केले आहे आणि आठ राज्यांमध्ये 324 ठिकाणी छापे टाकले आहेत. या छाप्यानंतर एनआयएने तिघांना अटक केली आहे. एजन्सीने हरियाणातील भिवानी येथून प्रवीण वाधवा, दिल्लीतील न्यू सीलमपूर येथून इरफान आणि पंजाबमधील मोगा येथून जस्सा सिंग यांना अटक केली आहे.
लॉरेन्स बिश्नोई आणि दहशतवादी अर्श दलाशी संबंध
एनआयएकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण वाधवा हा लॉरेन्स बिश्नोई टोळीसाठी काम करतो तर जस्सा सिंग कॅनडामध्ये लपून बसलेला दहशतवादी अर्श दलासाठी काम करतो. प्रवीण वाधवा हा लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या टोळीतील सदस्य संपत नेहरा आणि दीपक यांच्या सतत संपर्कात होता आणि लॉरेन्सचा संदेशवाहक म्हणून काम करत होता. तर, जस्सा सिंग अर्श दल आणि खलिस्तानी दहशतवाद्यांसाठी काम करत असे आणि अर्शच्या सांगण्यावरून शस्त्रेही पुरवत असे. इरफान नावाचा गुंड कौशल चौधरी आणि टिल्लू ताजपुरियासोबत सामील होता. एजन्सीने त्याच्या घरातून शस्त्रेही जप्त केली आहेत.
शस्त्रे, मोबाईल फोन आणि रोख रक्कम जप्त
NIA ने 17 मे रोजी पहाटे 5:30 वाजता गुंड आणि खलिस्तानी दहशतवाद्यांचे संबंध तोडण्यासाठी ऑपरेशन ध्वस्त सुरू केले होते. या कारवाईसाठी एजन्सीने हरयाणा आणि पंजाबच्या पोलिसांनाही सोबत घेतले, जेणेकरून या गुंडांचे नेटवर्क पूर्णपणे मोडून काढता येईल. दिल्ली, पंजाब, हरियाणा, यूपी, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि चंदीगड येथे टाकलेल्या या छाप्यात एजन्सीने शस्त्रांसह 60 मोबाईल फोन आणि 39.60 लाख रूपये रोख जप्त केले. याशिवाय तपासाशी संबंधित कागदपत्रे, 20 सिमकार्ड आणि इतर डिजिटल उपकरणेही जप्त करण्यात आली आहेत.
हे गुन्हेगार एनआयएच्या निशाण्यावर आहेत
एनआयएने अर्श दाला, लॉरेन्स बिश्नोई, छेनू पहलवान, दीपक तीतर, भूपी राणा, विकास लंगरपुरिया, आशिष चौधरी, गुरप्रीत सेखॉन, दिलप्रीत बाबा, हरसिमरत सिम्मा आणि कला राणाची साथीदार अनुराधा यांचे नेटवर्क तोडण्यासाठी हे छापे टाकले. या छाप्यामागे पाकिस्तान आणि कॅनडामध्ये बसलेल्या इतर टोळ्या आणि दहशतवाद्यांच्या संगनमताने अमली पदार्थ आणि दहशतीचा व्यवसाय चालवणाऱ्या या टोळ्यांना वित्त, शस्त्रे, रसद पुरवणाऱ्या गुंडांना मदत करणारे नेटवर्क तोडणे हा होता.
या टोळ्या चालवणारे सूत्रधार देशाबाहेर कॅनडा, मलेशिया, पाकिस्तान, ऑस्ट्रेलियामध्ये लपून बसले असून, त्यात गोल्डी ब्रार, लकी पटियाल आणि अर्श डाला सारखे बदमाश आणि दहशतवादी देशाबाहेर भारतात बसून पैसे कमावत असल्याचे तपासात समोर आले आहे. खंडणी आणि सुपारी घेऊन हत्या करणे यातून ते पैसे कमवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील अनेक गुंड तुरुंगात आहेत, मात्र असे असतानाही त्यांचे लोक अंमली पदार्थांची तस्करी, शस्त्रास्त्रे, खंडणी, हवाला याद्वारे सहज पैसे कमवत आहेत आणि त्यांच्या टोळ्या चालवत आहेत.
कारागृहात बसून गुन्हेगारांची टोळी चालवली जातेय
देशातील विविध तुरुंगात बंद असलेले हे बदमाश आपले नेटवर्क बेधडकपणे चालवत असून देशाबाहेर बसलेले लोक त्यांना यामध्ये मदत करत असल्याचेही समोर आले आहे. ते तुरुंगात बंद असलेल्या त्यांच्या शत्रूंनाही मारत आहेत आणि तुरुंगात टोळीयुद्धही पहायला मिळत आहे. त्यामध्ये 2 मे 2023 रोजी तुरुंगात टिल्लू ताजपुरियाची हत्या ही अलीकडील घटना आहे.
पंजाब आणि हरियाणा पोलिसांच्या मदतीने छापा
या संदर्भात NIA ने देशातील 8 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात 129 ठिकाणी छापे टाकले. दुसरीकडे, हरियाणा पोलिसांनी 10 जिल्ह्यांत 52 ठिकाणी तर पंजाब पोलिसांनी 17 जिल्ह्यांत 143 ठिकाणी छापे टाकले. याआधीही या टोळीला रोखण्यासाठी एनआयएने 231 ठिकाणी छापे टाकून 38 शस्त्रे जप्त केली होती. याप्रकरणी कारवाई करताना एजन्सीने आरोपींची 87 बँक खाती गोठवली आणि 13 मालमत्ता जप्त केल्या. याशिवाय देशातून फरार झालेल्या दोन गुन्हेगारांना वैयक्तिक दहशतवादी घोषित करण्यात आले आणि 14 बदमाशांच्या विरोधात एलओसी-लूक आउट परिपत्रक जारी केले, जेणेकरून ते देशातून पळून जाऊ नयेत. NBW म्हणजेच अजामीनपात्र वॉरंट देखील 10 बदमाशांच्या विरोधात जारी करण्यात आले होते, जेणेकरून त्यांना लवकरच अटक करता येईल.