राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) २० मे रोजी दहशतवादाशी संबंधित प्रकरणात जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील चार ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. गुस्सू, राजपोरा, अवंतीपोरा आणि त्राल येथे छापे टाकले जात आहेत. यावेळी जम्मू आणि काश्मीर पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) कर्मचारीही उपस्थित आहेत.
दरम्यान, विशेष तपास युनिटने बुधवारी रेशीपोरा त्रालमधील अनेक ठिकाणी छापे टाकले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार SIU ने त्राल पोलिस स्टेशनच्या प्रकरणाच्या संदर्भात छापा टाकला. मंजूर अहमद वानी, मोहसीन अहमद लोन आणि अरियाफ बशीर भट या तीन संशयितांच्या घरांवर छापे टाकण्यात आले.
कर्नाटकात शक्तिप्रदर्शन; सिद्धरामय्या, शिवकुमार आज घेणार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदाची शपथ
छाप्यामध्ये एसआययू अवंतीपोराद्वारे साहित्य जप्त करण्यात आले, दहशतवादाशी संबंधित अतिरिक्त गुन्ह्यांमध्ये तीन संशयितांच्याबद्दल तपासासाठी छापे टाकण्यात आले.
१२ मे रोजी, रामबन जिल्हा पोलिसांसह राज्य अन्वेषण युनिटने जम्मू आणि काश्मीरमधील बनिहाल उपविभागाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या बनिहाल आणि रामसूच्या भागात अनेक ठिकाणी छापे टाकले.