शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
2
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
3
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
4
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
5
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
6
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
7
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
8
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
9
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
10
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
11
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
12
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
14
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
15
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
16
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
17
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
18
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
20
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले

निकम, भांडारकर, देवगण, खेर, रजनीकांत, प्रियांका पद्मचे मानकरी

By admin | Published: January 26, 2016 3:32 AM

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सोमवारी देशातील सर्वोच्च नागरी सन्मान मानले जाणारे पद्म पुरस्कार जाहीर झाले असून, सुपरस्टार रजनीकांत, रिलायन्स समूहाचे संस्थापक दिवंगत धीरूभाई अंबानी

पुरस्कार जाहीर : धीरूभाई अंबानी यांना मरणोत्तर पद्मविभूषणनवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सोमवारी देशातील सर्वोच्च नागरी सन्मान मानले जाणारे पद्म पुरस्कार जाहीर झाले असून, सुपरस्टार रजनीकांत, रिलायन्स समूहाचे संस्थापक दिवंगत धीरूभाई अंबानी, आर्ट आॅफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर आणि माध्यम सम्राट रामोजी राव यांची पद्मविभूषणसाठी निवड झाली आहे. पद्मभूषण पुरस्कारासाठी निवडण्यात आलेल्या एकूण १९ मान्यवरांमध्ये माजी नियंत्रक व महालेखाकार (कॅग) विनोद राय, माध्यम समूह बेनेट कोलमॅन अ‍ॅण्ड कंपनीच्या अध्यक्ष इंदू जैन, टेनिसपटू सानिया मिर्झा, बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, आध्यात्मिक गुरू दिवंगत स्वामी दयानंद सरस्वती आणि स्वामी तेजोमायानंद आणि भारतातील अमेरिकेचे राजदूत रॉबर्ट ब्लॅकविल, उद्योगपती पलोनजी शपूरजी मिस्त्री, मारुती सुझुकीचे अध्यक्ष आर.सी. भार्गव आणि प्रख्यात आर्किटेक्ट हफीज कॉन्ट्रॅक्टर यांचाही समावेश आहे. मुंबई बॉम्बस्फोट तसेच अतिरेकी हल्ल्यातील सरकारी वकील तसेच प्रख्यात कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम व दिग्दर्शक मधुर भांडारकर हे पद्मश्रीचे मानकरी असून, महाराष्ट्रातील प्रसिद्ध मूर्तिकार राम व्ही. सुतार, मणिपुरी नाट्यकलावंत हसनम कन्हैयालाल, हिंदी आणि तेलगू लेखक यारालगड्डा लक्ष्मी प्रसाद, संस्कृतचे विद्वान एन.एस. रामानुज तातचार्य, पंजाबी पत्रकार बरजिंदरसिंग हमदर्द, गॅस्ट्रोएन्टोरोलॉजिस्ट डी. नागेश्वर रेड्डी आणि शास्त्रज्ञ ए.व्ही. रामाराव हे पद्मभूषणचे मानकरी आहेत. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर, गायक उदित नारायण यांना पद्मभूषण तर अभिनेता अजय देवगण व अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. (वृत्तसंस्था)११२ जण पुरस्काराने सन्मानितजम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल जगमोहन, संरक्षण संशोधन व विकास संघटनेचे (डीआरडीओ) माजी प्रमुख व्ही.के. अत्रे, कॅन्सरतज्ज्ञ आणि अडयार कॅन्सर संस्थेचे प्रमुख डॉ. व्ही. शांता, प्रसिद्ध भरतनाट्यम् आणि कुचिपुडी नृत्यांगना यामिनी कृष्णमूर्ती, शास्त्रीय गायिका गिरिजादेवी आणि भारत-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ अविनाश दीक्षित हेसुद्धा पद्मविभूषणचे मानकरी ठरले आहेत. ३६५ जवानांचा राष्ट्रपती पदकाने सन्मान अतुलनीय कामगिरी करणाऱ्या ३६५ जवानांचा विविध पदके देऊन गौरव केला जाणार असून, राष्ट्रीय रायफल्सचे लान्स नायक मोहननाथ गोस्वामी यांना सर्वोच्च मानाच्या ‘अशोक चक्र’ या पदकाने मरणोत्तर सन्मानित केले जाईल.महाराष्ट्राचे साताऱ्याचे सुपुत्र कर्नल संतोष महाडिक यांनाही मरणोत्तर शौर्य चक्र जाहीर झाले आहे. जम्मू- काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यात अतिरेक्यांशी लढताना संतोष महाडिक हुतात्मा झाले होते. पुरस्कारांमध्ये अशोक चक्र, ४ कीर्ती चक्र, ११ शौर्य चक्र, ४८ सैन्य पदक (शौर्य) ४ नौदल पदक (शौर्य), २ वायूदल पदक (शौर्य), २९ परम विशिष्ट सेवा पदक, ५ उत्तम युद्व सेवा पदक, ४ अति विशिष्ट सेवा पदक, २० युद्ध सेवा पदक, ३७ सैन्य पदक (कर्तव्य समर्पण), ८ नौदल पदक (कर्तव्य समर्पण), १६ वायूदल पदक (कर्तव्य समर्पण), ११८ विशिष्ट सेवा पदकांचा समावेश आहे.राज्यातील ५० जणांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीरमुंबई/ नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरातील ८४१ पोलीस कर्मचाऱ्यांचा त्यांचे शौर्य आणि प्रशंसनीय कामाबद्दल पोलीस पदक बहाल करून गौरव केला जाणार आहे. त्यात महाराष्ट्रातील ५० पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. राष्ट्रपती पोलीस पदकासाठी (पीपीएमजी) ३, पोलीस पदकासाठी (पीएमजी) १२१, उत्कृष्ट सेवेबद्दलच्या राष्ट्रपती पोलीस पदकासाठी ८९ आणि विशेष सेवेबद्दलच्या पोलीस पदकासाठी ६२८ पोलिसांची निवड केली.