शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

नाईकच्या एनजीओची देणगी केली परत !

By admin | Published: September 11, 2016 4:08 AM

वादग्रस्त इस्लामी प्रवचक झाकीर नाईक यांच्या एनजीओने राजीव गांधी फाउंडेशनला (आरजीएफ) ५0 लाख रुपयांची देणगी दिली होती.

शीलेश शर्मा,  नवी दिल्ली वादग्रस्त इस्लामी प्रवचक झाकीर नाईक यांच्या एनजीओने राजीव गांधी फाउंडेशनला (आरजीएफ) ५0 लाख रुपयांची देणगी दिली होती. तथापि, ढाक्यातील हल्ल्यात त्याचे नाव समोर आल्यानंतर फाउंडेशनने ही देणगी परत केली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयातील सूत्रांनी सांगितले की, इस्लामिक रीसर्च फाउंडेशनने २0११ मध्ये आरजीएफला ५0 लाखांची देणगी दिली होती. ही सेवाभावी संस्था असून, मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहित करण्यापासून ते गरीब रुग्णांना आर्थिक मदत करण्यापर्यंत विविध कामे ती करते. २00२ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेचे काम उत्तर प्रदेशातील मागास भागात चालते. इस्लामिक रीसर्च फाउंडेशनचे प्रवक्ते आरिफ मलिक यांनी सांगितले की, राजीव गांधी फाउंडेशनला आम्ही देणगी दिली होती. ढाक्यातील अतिरेकी हल्ल्यानंतर यंदाच्या जुलैमध्ये ही देणगी राजीव गांधी फाउंडेशनने परत केली आहे. आम्ही इतरही अनेक एनजीओंना देणग्या दिल्या आहेत. त्यामुळे एकट्या राजीव गांधी फाउंडेशनला टार्गेट करण्याचे कारण नाही. मलिक म्हणाले की, सरकार २0१४ पासून आमची चौकशी करीत आहे. त्यातून काहीही हाती लागलेले नाही. आमचा एफसीआरए परवाना आॅगस्ट २0१६ मध्ये नूतनीकृत केला. ज्या अधिकाऱ्याने परवाना नूतनीकरण केले, त्याला काहीही बेकायदा आढळले नाही. त्याने नियमानुसार काम केले; पण सरकारने या अधिकाऱ्यालाच निलंबित केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)हा बंदी घालण्याचाच चंग; डॉ. नाईक यांचे पत्रगेली २५ वर्षे इस्लामचा आणि त्यातील शांतता व सलोख्याच्या शिकवणुकीचा प्रसार करताना एखादा गुन्हा तर सोडाच, पण कोणतेही गैरकृत्य केलेले नसूनही माझ्यावर आणि माझ्या इस्लामी रीसर्च फाउंडेशनवर काहीही करून बंदी लादण्याचा केंद्र व राज्य सरकारने चंग बांधला आहे. हे उद्दिष्ट आधीच ठरवून ते साध्य करण्यासाठी पुरावे खोदून काढले जात आहेत आणि मला निष्कारण बदनाम केले जात आहे, असा दावा वादग्रस्त धर्मप्रचारक डॉ. झाकीर नाईक यांनी शनिवारी केला.उचापतखोर शक्तींना मोकळे रान मिळेलखरोखरच बंदी लागू झाली तर भारतातील लोकशाहीला अलीकडच्या काळातील तो सर्वात मोठा धक्का असेल. हे मी फक्त माझ्यापुरते बोलत नाही, कारण अशा बंदीमुळे या देशातील २० कोटी मुस्लिमांवरील अन्यायाचा पायंडा घातला जाईल. या कारवाईमुळे देशातील उचापतखोर शक्तींना हवे ते करण्याचे मोकळे रान मिळेल. देशातील आधीच वाढलेली असहिष्णुता सरकारच्या या कृतीमुळे कधी नव्हे एवढी शिगेला पोहोचेल. या बंदीनंतर त्यांच्यापैकी प्रत्येकाच्या मनात आता आपला नंबर केव्हाही लागेल, याची धास्ती निर्माण होईल. देशातील मुस्लीम समाज आधीच घाबरलेला व असुरक्षित आहे. ही तर मूलभूत हक्कांची गळचेपी, भविष्यासाठी अत्यंत वाईट पायंडा डॉ. नाईक म्हणतात की, राज्यघटनेने मला माझ्या धर्माचे पालन करण्याचा व त्याचा प्रसार-प्रचार करण्याचा अधिकार दिला आहे. त्याचबरोबर सरकारमध्ये बसलेल्यांनी राज्यघटनेचे पालन करण्याची शपथ घेतली आहे. असे असूनही गेले दोन महिने माझ्याविरुद्ध हेतुपुरस्सर विखारी मोहीम चालविली जात आहे. त्यासाठी सरकार आपल्या हातातील यंत्रणांचा व प्रसिद्धी माध्यमांचा सोयीस्करपणे वापर करून घेत आहे. हा लोकशाहीचा खून आहे.एक नागरिक म्हणून माझ्या मूलभूत हक्कांची गळचेपी आहे व भविष्यासाठी हा वाईट पायंडा आहे.