निंभोरा आठवडे बाजारात कामात १५ लाखांचा अपहार पत्रपरिषद : गुन्हा दाखल करण्याची मागणी
By admin | Published: October 29, 2015 10:02 PM
जळगाव : रावेर तालुक्यातील निंभोरा बुद्रुक या गावात शासनाच्या महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषिविकास प्रकल्पातंर्गत सुरू असलेल्या आठवडे बाजार विकास कामात बाजार ओट्यांचे कोणतेही काम न करता समितीच्या खात्यावरून १५ लाख रुपयांची रक्कम काढण्यात आली आहे. या प्रकरणी सरपंच, ग्रामविकास अधिकारी व व्यवस्थापन समिती सदस्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी जनसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विवेक ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली.
जळगाव : रावेर तालुक्यातील निंभोरा बुद्रुक या गावात शासनाच्या महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषिविकास प्रकल्पातंर्गत सुरू असलेल्या आठवडे बाजार विकास कामात बाजार ओट्यांचे कोणतेही काम न करता समितीच्या खात्यावरून १५ लाख रुपयांची रक्कम काढण्यात आली आहे. या प्रकरणी सरपंच, ग्रामविकास अधिकारी व व्यवस्थापन समिती सदस्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी जनसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विवेक ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली.जिल्हा पत्रकारसंघात झालेल्या या पत्रकार परिषदेत माहिती देतांना ठाकरे यांनी सांगितले की, निंभोरा बुद्रुक गावात एमएसटी अंतर्गत आठवडे बाजार विकास कामासाठी २५ लाख मंजूर झाले होते. या कामासाठी ग्रामस्तरावर ग्रामपंचायतच्या १ मे २०१३ रोजीच्या ग्रामसभेत ठराव करून व्यवस्थापन समितीची स्थापना केली. त्यानंतर ठेकेदार नियुक्त करण्यासाठी विशेष मासिक सभा घेण्यात आली. मात्र सभेच्या इतिवृत्ताची दप्तरात नोंद नाही. शासकीय अनुदानाबाबत गैरव्यवहार केल्याने डीडीआर कार्यालयाने सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना कळविले आहे. त्यावेळी ग्रामविकास अधिकार्यांनी तथ्यहिन खुलासा सादर केला आहे. याबाबत जि.प.प्रशासनाला कारवाईचे आदेश दिल्यानंतरदेखील डोळेझाक केली जात आहे. या प्रकरणी चौकशी होऊन १५ दिवसात गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.