शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

घशातून काढल्या नऊ सुया!; मांत्रिकाने सुया टोचल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2018 3:09 AM

येथील निल रतन सरकार सरकारी इस्पितळातील डॉक्टरांनी एका १४ वर्षांच्या मुलीवर चार तास शस्त्रक्रिया करून तिच्या घशात अडकलेल्या नऊ सुया काढल्या.

कोलकाता : येथील निल रतन सरकार सरकारी इस्पितळातील डॉक्टरांनी एका १४ वर्षांच्या मुलीवर चार तास शस्त्रक्रिया करून तिच्या घशात अडकलेल्या नऊ सुया काढल्या.अपरुपा बिश्वास नावाची ही मुलगी मुळची कृष्णनगरमधील असून मंगळवारी तिच्यावर शस्त्र्रक्रिया करण्यात आली. सुया गिळल्यामुळे तिच्या घशात अडकलेल्या नव्हत्या. तर बाहेरून टोचलेल्या सुया मोडून मांसल भागात अडकल्या होत्या. इस्पितळाचे ‘ईएनटी’ सर्जन नमोज मुखर्जी यांनी सांगितले की, गळ््याच्या मांसामध्ये रुतलेल्या या सुया अन्ननलिकेच्या आत गेलेल्या नव्हत्या.ही मुलगी सध्या बोलण्याच्या अवस्थेत नाही. तिच्या पालकांनीही एवढ्या सुया मुलीच्या गळ््यात कशा अडकल्या याविषयी मौन पाळले. मात्र या कुटुंबाच्या कृष्मनगरमधील शेजाऱ्यांनी कदाचित मांत्रिकाने या सुया टोचल्या असाव्यात, अशी शंका व्यक्त केली. या मुलीचा मोठा भाऊ तीन वर्षांपूर्वी वारला. नंतर तिच्या आई-वडिलांनी एक मुलगी दत्तक घेतली. पण तीही दगावली. कुटुंबातील या लागोपाठच्या दोन दु:खद घटनांमुळे ही मुलगी घोर नैराश्यात गेली. त्यावर उपचार करण्यासाठी तिला मांत्रिकाकडे नेण्यात आले होते, असे शेजाºयांचे म्हणणे आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :hospitalहॉस्पिटल