त्रिची : केरळमध्ये मुसिरीनजिकच्या खेड्यात गुरुवारी ३९ वर्षांच्या व्यक्तिशी नऊ वर्षांच्या मुलीचे होणारे लग्न पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे उधळले गेले. या मुलीला येथील सरकारी सुधार व संरक्षण केंद्रात ठेवण्यात आले आहे. मुसिरीतील गुरुवारी महिलाच असलेल्या पोलिस ठाण्याला अज्ञात व्यक्तीकडून दूरध्वनी आला. पोलिसांनी तातडीने कारवाई केली.दूरध्नवी करणा-याने ठाण्याला असे सांगितले की त्याने चौथ्या वर्गात शिकणा-या मुलीचे लग्न गुरुवारीच ३० वर्षांच्या व्यक्तिशी मिन्नाथम्पत्ती (तालुका थोट्टीयाम) येथे लावून दिले जाणार असल्याचे ऐकले. ती मुलगी त्या भागातील सरकारी शाळेत शिकते. पोलिस निरीक्षक लता आणि त्यांच्या सहकारी खेड्यात दाखल झाले त्यावेळी त्यांना मिळालेली माहिती खरी असल्याचा वास आला. त्यामुळे त्यांनी शेतमजुरी करणाºया मुलीच्या विधवा आईच्या ताब्यातून मुलीची सुटका करून तिला बालकल्याण समितीकडे त्याच रात्री सोपवले.या समितीने केलेल्या चौकशीत त्या मुलीचे लग्न लावून देण्याची तयारी सुरू झाल्याचे त्यांना दिसले. प्राथमिक माहितीनुसार लग्नाचा प्रस्ताव होता, असे आढळले. आता मुलीला आमच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.
नऊ वर्षांच्या मुलीचे लग्न पोलिसांनी उधळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 1:08 AM