कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका बसलेल्या केरळमध्ये काही दिवसांपासून प्रशासनाची उरलीसुरली झोपही उडाली आहे. निपाह व्हायरसमुळे (Nipah Virus) एका 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. परंतू या एकट्या मुलाच्या संपर्कात तब्बल 251 लोक आल्याने केरळ (Kerala) सरकारच हादरले आहे. यामुळे प्रशासनाने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. (Total 251 people include 129 health workers in contact with died child by Nipah Virus in Kerala.)
कोझिकोड भागातच 11 लोकांमध्ये निपाह व्हायरसची लक्षणे दिसून आली आहेत. केरळच्या आरोग्य मंत्री वीना जॉर्ज यांनी सांगितले की, एकूण 8 हाय रिस्कमधील संपर्कातील व्यक्तींच्या स्वॅबचे नमुने पुण्याच्या लॅबमध्ये पाठविण्यात आले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, मृत मुलाच्या संपर्कात आलेले त्याचे वडील आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे सॅम्पल निगेटिव्ह आले आहेत.
केरळच्या कोझिकोड मेडिकल कॉलेजमध्ये सँपल टेस्टिंग करून निपाह व्हायरस सापडतो का ते पाहिले जात आहे. जवळपास 48 हाय रिस्कवाल्य़ा व्य़क्तींना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. यापैकी 31 जण कोझिकोड येथील आहेत. तर उर्वरित वायनाड, मल्लपुरम आणि पल्लकड येथील आहेत.
ज्या मुलाचा मृत्यू झाला, त्याच्या संपर्कात 251 लोक आले होते. त्यांना आयसोलेट करण्यात आले आहे. यापैकी 129 लोक हे आरोग्य कर्मचारी आहेत. वैद्यकीय पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. दुसरीकडे अॅनिमल हस्बंड्रीची टीमदेखील आजुबाजुच्या परिसरातील वृक्ष, झुडुपे आदी ठिकाणी तपासणी करत आहेत. जिथे जिथे वटवाघूळ येण्याची शक्यता आहे, तिथे तिथे जाऊन सॅम्पल गोळा केले जात आहेत.
कर्नाटकमध्येही अलर्टकेरळला लागून असलेल्या कर्नाटकनेही अलर्ट जारी केला आहे. इथे केरळ बॉर्डरच सील करण्यात आली आहे. सीमाभागात लसीकरण आणि टेस्टिंगही वाढविण्यात आले आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच कार्यवाही केली जाईल असे सरकारने म्हटले आहे. केंद्राने पहिल्या दिवशीच एक टीम केरळला पाठविली आहे.