Budget Session: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेसने अदानी प्रकरणाचा मुद्दा चांगलाच लावून धरला आहे. यावरुन काँग्रेसकडून भाजपवर जोरदार टीका केलीजात आहे. शुक्रवारीही सभागृहात चांगलाच गदारोळ झाला. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Niramala Sitharaman) लोकसभेत बोलत असताना काँग्रेस नेत्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले. याला अर्थमंत्र्यांनी शेलक्या शब्दात प्रत्युत्तर दिले.
सभागृहात 2023-24 च्या अर्थसंकल्पावर चर्चा सुरू होती, यावेळी काँग्रेसच्या काही खासदारांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तात्काळ प्रत्युत्तर दिले. त्या म्हणाल्या, 'तुम्ही काँग्रेसवाले भ्रष्टाचारावर बोलत आहात. जा डेटॉलने तोंड स्वच्छ करुन या.' त्यांचे हे वाक्य ऐकताच सभागृहात एकच हशा पिकला.
हिमाचल प्रदेशमध्ये सत्तेत आल्यानंतर काँग्रेस सरकारने डिझेलवरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) वाढवला असल्याचेही त्या म्हणाल्या. तसेच, ही काँग्रेसची संस्कृती आहे. आधी आरोप करायचे आणि नंतर सभागृहातून निघून जायचे. पण कुणाच ऐकणार नाहीत. पंजाबने फेब्रुवारी 2023 मध्ये पेट्रोल आणि डिझेलवर व्हॅट वाढवला आहे, ज्यामुळे किंमत सुमारे 95 रुपये प्रति लिटरने वाढली, असंही त्या म्हणाल्या.
अशोक गेहलोत यांना टोमणायावेळी त्यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनाही टोमणा मारला. यावेळी एका सत्ताधारी खासदाराने अर्थमंत्र्यांना राजस्थानवर बोलण्याची विनंती केली, तेव्हा सीतारामन म्हणाल्या, राजस्थान संकटात आहे भाऊ. तेथील मंत्री गेल्या वर्षीचा अर्थसंकल्प वाचतात. चुका कोणाकडूनही होऊ शकतात, पण मागच्या वर्षीचा अर्थसंकल्प वाचावा लागेल, अशी परिस्थिती कोणावरही येऊ नये, अशी मी देवाकडे प्रार्थना करते.