नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील निर्भयाच्या आईने पुन्हा दोषींची फाशीची शिक्षा कोर्टाच्या पुढील आदेशापर्यंत टळल्याने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. निर्भयाच्या दोषींना फाशी देण्याच्या स्वत: च्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी कोर्ट इतका वेळ का घेत आहे? असा सवाल निर्भयाची आई आशादेवी यांनी उपस्थित केला. तसेच वारंवार फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी पुढे ढकलणं हे आपल्या सिस्टमचे अपयश दर्शवते आणि आपली संपूर्ण सिस्टम गुन्हेगारांना अभय देते असल्याची कटू प्रतिक्रिया आशादेवी यांनी दिली.
Nirbhaya Case : तारीख पे तारीख! पुन्हा निर्भयाच्या दोषींची फाशी पुढील आदेशापर्यंत टळली
निर्भयाच्या गुन्हेगारांचे हैदराबादसारखे एन्काऊंटर केले पाहिजे होते, भाजपा खासदाराचे विधान
काही दिवसांपूर्वी दिल्लीतील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी दिल्ली कोर्टात निर्भयाच्या आईने टाहो फोडत कृपया चार दोषींविरोधात नवीन डेथ वॉरंट जारी करण्याची विनंती केली होती. निर्भयाच्या चारही दोषींच्या फाशीच्या शिक्षेला विलंब होत असल्याने निर्भयाची आई आशादेवी यांनी कोर्टात धाव घेतली होती आणि नवं डेथ वॉरंट काढण्यासाठी याचिका दाखल केली होती. त्यानंतर या याचिकेच्या सुनावणीदरम्यान आशादेवी कोर्टात हजर झाल्या होत्या असून त्यांनी माझ्या हक्काचं काय? असा कोर्टाला सवाल केला होता. तसेच मी सुद्धा माणूस आहे असं म्हणत कोर्टातच टाहो फोडत खाली कोसळल्या होत्या.