शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"
2
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
3
देवेंद्र जी, आप भी चुनाव लड रहे है... मोदींनी नाव घेताच देवेंद्र फडणवीस धावत आले, धुळ्यातील सभेत काय घडलं?
4
SA vs IND : ऋतुराज गायकवाडला पुन्हा का वगळलं? भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवचं मोठं विधान
5
ट्रम्प यांची एक घोषणा आणि Waaree Energies Shares आपटले; २ दिवसांत १०% ची घसरण
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
7
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
8
Wipro ला मिळाल्या २ ब्लॉक डील्स; ८.५ कोटी शेअर्सचं ट्रान्झॅक्शन; शेअर्सवर काय परिमाम होणार?
9
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
10
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...
11
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
12
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
13
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
14
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
15
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
16
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
17
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
18
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
19
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
20
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा

निर्भया : आरोपींचे वकील म्हणाले, तिहारचे अधिकारी दस्तावेज देत नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 5:43 AM

निर्भया बलात्कार आणि हत्या खटल्यातील चारपैकी दोन दोषींच्या वकिलाने तिहार कारागृहाचे अधिकारी काही दस्तावेज उपलब्ध करून देण्यात विलंब करीत असल्याचा आरोप करणारी याचिका शुक्रवारी दिल्ली न्यायालयात केली.

नवी दिल्ली : निर्भया बलात्कार आणि हत्या खटल्यातील चारपैकी दोन दोषींच्या वकिलाने तिहार कारागृहाचे अधिकारी काही दस्तावेज उपलब्ध करून देण्यात विलंब करीत असल्याचा आरोप करणारी याचिका शुक्रवारी दिल्ली न्यायालयात केली. दोषी अक्षय कुमार सिंह (३१) आणि पवन गुप्ता (२५) यांच्या वतीने क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यासाठी आवश्यक दस्तावेज कारागृह अधिकाऱ्यांनी अजूनही उपलब्ध करून दिलेला नाही, असे वकील ए.पी. सिंह यांनी म्हटले.विनय शर्मा, अक्षय कुमार सिंह, मुकेश सिंह आणि पवन गुप्ता यांना १ फेब्रुवारी रोजी फाशी देण्यासाठी नव्याने डेथ वॉरंट जारी केलेहोते. या सगळ्यांना २२ जानेवारी रोजी फाशी दिली जाणार होती; परंतु त्यांच्या याचिका प्रलंबित राहिल्यामुळे शिक्षा अमलात आली नाही.या खटल्यात सहा आरोपी होते. त्यातील एक जण अल्पवयीन होता. सुधारगृहात शिक्षा भोगून झाल्यावर त्याची सुटका झाली. राम सिंह याने तिहार कारागृहात आत्महत्या केली होती.याचिकेवर आज होणार सुनावणीफाशीची शिक्षा टाळण्यासाठी दोषी हे नाही, तर दुसरे कारण शोधत असल्याचे यातून दिसते. या याचिकेवर शनिवारी सुनावणी होणार आहे. विनय कुमार शर्मा (२६) आणि मुकेश सिंह (३२) यांनी दाखल केलेल्या क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच फेटाळल्या आहेत.केंद्र सरकारने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत अत्यंत घृणास्पद गुन्ह्यातील दोषी न्यायालयीन प्रक्रियेचा लाभ घेत आहेत, असे म्हटले. ब्लॅक वॉरंट जारी झाल्यावर दोषींना सात दिवसांत फाशीची शिक्षा दिली जाण्याची मर्यादा असावी, अशी मागणी केंद्र सरकारने केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNew Delhiनवी दिल्ली