नवी दिल्ली: निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या चार गुन्हेगारांची फाशी पुन्हा एकदा टळली आहे. पुढील आदेश जारी करेपर्यंत दोषींना फाशी देऊ नका, असे आदेश दिल्लीतल्या एका न्यायालयानं तिहार तुरुंग प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे निर्भया प्रकरणातल्या दोषींची फाशी लांबणीवर पडली आहे. यासाठी निर्भयाच्या आईनं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जबाबदार धरलं आहे. तर केजरीवालांनी फाशीच्या शिक्षेला होत असलेल्या विलंबाला कायदे आणि त्यातल्या तरतुदी जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. याशिवाय कायद्यात बदल आवश्यक असल्याचं मतदेखील नोंदवलं आहेन्यायालयानं आज दोषींची फाशी पुढे ढकलली. आणखी किती दिवस अशीच टाळाटाळ सुरू राहणार?, असा सवाल निर्भयाच्या वडिलांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना उपस्थित केला. तुरुंग प्रशासन केजरीवालांच्या अखत्यारित येतं. संपूर्ण व्यवस्था त्यांच्या हातात आहे. त्यांच्यामुळेच सगळं काही थांबलं आहे, असे निर्भयाचे वडील म्हणाले.
Nirbhaya Case: केजरीवालांमुळे टळतेय दोषींची फाशी; निर्भयाच्या आई-वडिलांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 8:46 PM