नवी दिल्ली: निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या आरोपीनं डोकं भिंतीवर आपटून स्वत:ला जखमी करुन घेण्याचा प्रयत्न केला आहे. निर्भया प्रकरणातला दोषी विनय शर्मानं तिहार तुरुंगातल्या भिंतीवर डोकं आपटून घेतलं. यानंतर तुरुंग प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांनी त्याला रोखलं आणि रुग्णालयात दाखल केलं. तिथे त्याच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला. विनय शर्माची मानसिक स्थिती ठीक नसल्याचा दावा त्याच्या वकिलांनी केला. मात्र तुरुंग प्रशासनानं त्यांचा हा दावा फेटाळून लावला. विनय शर्माच्या मानसिक स्थितीवर परिणाम झाल्याची कोणतीही लक्षणं दिसत नसल्याचं तुरुंग प्रशासनानं स्पष्ट केलं. विनयची मानसिक स्थिती उत्तम असून तो मानसोपचारतज्ज्ञांच्या उपचारांना व्यवस्थित प्रतिसाद देत असल्याची माहिती तुरुंग अधिकाऱ्यांनी दिली. निर्भया सामूहिक बलात्कार व खून खटल्यात मृत्युदंडाची शिक्षा झालेल्या चारही खुन्यांना फाशी देण्यासाठी सत्र न्यायालयानं सोमवारी ३ मार्च ही नवी तारीख निश्चित केली आहे. त्यानुसार विनय कुमार शर्मासह मुकेश कुमार सिंग, पवन गुप्ता आणि अक्षय कुमार यांना ३ मार्चला सकाळी ६ वाजता दिल्लीच्या तिहार कारागृहात फाशी दिली जाईल. सत्र न्यायालयानं फाशीची तारीख निश्चित केल्यापासून चारही दोषी अतिशय आक्रमक पद्धतीनं वागत आहेत. दोषींनी आत्महत्येचा प्रयत्न करू नये यासाठी त्यांच्यावर तुरुंगातल्या कर्मचाऱ्यांकडून २४ तास नजर ठेवली जात आहे. त्यांची मानसिक स्थिती योग्य राहील याची काळजी घेतली जात आहे. दोषी अतिशय हिंसक पद्धतीनं वागत असून स्वत:ला जखमी करण्याचे प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहेत. फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेला गुन्हेगार जखमी किंवा मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्यास त्याची स्थिती सुधारेपर्यंत फाशीची शिक्षा पुढे ढकलली जाते. तशी तरतूद कायद्यात आहे. त्यामुळेच आपण मानसिकदृष्ट्या स्थिर, शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त नसल्याचं दाखवण्याचा प्रयत्न दोषींकडून सुरू आहे.
Nirbhaya Case : फाशी पुढे ढकलण्यासाठी दोषीनं भिंतीवर वारंवार आपटलं डोकं
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 9:48 AM
Nirbhaya Case : फाशी पुढे ढकलण्यासाठी दोषींकडून स्वत:ला जखमी करण्याचा प्रयत्न
ठळक मुद्देविनय शर्मानं तिहार तुरुंगातल्या भिंतीवर डोकं आपटलंस्वत:ला जखमी दाखवून फाशी पुढे ढकलण्याचा प्रयत्नचारही आरोपींना ३ मार्चला होणार फाशी