Sitaraman Barack Obama: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जोरदार टीका केली. सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत मुस्लिमांसोबतच्या वागणुकीच्या मुद्द्यावर उत्तर देताना पंतप्रधान मोदींचा बचाव केला आहे. यादरम्यान सीतारामन यांनी काँग्रेसवर 'माहिती नसलेले आणि निरुपयोगी मुद्दे' उपस्थित केल्याचा आरोप केला आहे.
ओबामांच्या काळात बॉम्बहल्लेअमेरिकेचे माजी पंतप्रधान बराक ओबामा यांच्या भारतातील मुस्लिमांना वागणूक देण्याच्या वक्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सीतारामन म्हणाल्या की, बराक ओबामा यांच्या काळात 6 मुस्लिमबहुल देशांवर बॉम्बहल्ले झाले. 'सबका साथ-सबका विकास'वर सरकारचा विश्वास आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले होते. त्याप्रमाणे आम्ही कोणत्याही समाजात भेदभाव करत नाही, अशी प्रतिक्रिया सीतारामन यांनी दिली.
मोदींचा 13 देशांकडून सन्मानत्या पुढे म्हणाल्या की, लोक सहसा असे मुद्दे उपस्थित करतात, जे खरोखरच मोठी समस्या नसतात. पंतप्रधान मोदींना आतापर्यंत एकूण 13 देशांमधून सर्वोच्च सन्मान मिळाले आहेत, त्यापैकी 6 मुस्लिम बहुल देशांनी दिले आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेबाबत राज्य पातळीवर काही मुद्दे उपस्थित केले जात आहेत. यासाठी अनेक जबाबदार लोक काम करत आहेत.
काँग्रेसवर टीकाइतर लोक माहितीशिवाय आरोप करतात, यावरून भाजपविरोधातील ही संघटित मोहीम असल्याचे दिसून येते. मला वाटते की इतर पक्ष निवडणुकीत भाजप आणि पंतप्रधान मोदींशी स्पर्धा करू शकत नाहीत, म्हणूनच अशाप्रकारचा प्रचार करत आहेत. विरोधी पक्षांमध्ये प्रामुख्याने काँग्रेस गेल्या काही निवडणुकांपासून अशा गोष्टी पसरवत आहे, असेही त्या म्हणाल्या.