ऑनलाइन लोकमत इलाहाबाद, दि. २८ - बहुचर्चित निठारी हत्याकांडातील आरोपी सुरेंद्र कोहलीच्या शिक्षेत अलाहाबाद उच्च्ा न्यायालयाने बदल केला आहे.सुरेंद्र कोहलीला सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा न्यायालयाकडून रद्द करण्यात आली असून कोहलीला आता फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा भोगावी लागणार आहे. मुख्य न्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड आणि न्यायाधीश प्रदीपकुमार सिंह यांच्या खंडपीठाने बुधवारी पीपल्स फॉर डेमोक्रॅटीक राईट यांच्या याचिकेवर सुनावणी करताना हा निर्णय सुनावला. निठारी हत्याकांडातील तपासात राज्य सरकारने केलेल्या दिरंगाईबाबतही उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. दरम्यान, याआधी इलाहाबाद उच्च न्यायालयाने कोहलीच्या फाशीच्या शिक्षेवर १६ जानेवारीपर्यंत स्थगीती आणली होती.
निठारी हत्याकांड : सुरेंद्र कोहलीला फाशीऐवजी जन्मठेप
By admin | Published: January 28, 2015 4:33 PM