शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

NITI Aayog Meeting: NITI आयोगाची बैठक; मुख्यमंत्र्यांसोबत 2047 वर चर्चा; PM मोदींनी अनेक मुद्द्यांवर वेधले लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2022 6:05 PM

NITI Aayog Meeting: बैठकीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, शहरी प्रशासन, कोविड नंतरची परिस्थिती आणि 2047चे टार्गेट, या विषयांवर चर्चा झाली.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी NITI आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलची महत्त्वपूर्ण बैठक झाली. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधानांनी कृषी विविधीकरणाचे महत्त्व व्यक्त केले, विशेषत: खाद्यतेलामध्ये स्वयंपूर्ण होण्याची गरज असल्याचे सांगितले. 

2047 वर फोकसया बैठकीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, शहरी प्रशासन, कोविड नंतरची परिस्थिती आणि 2047 चे लक्ष्य, या विषयांवरही चर्चा झाली. याशिवाय डाळींचे उत्पादन आणि पुढील वर्षी भारतात होणाऱ्या G-20 बैठकीबाबतही या बैठकीत चर्चा झाली आहे. NITI आयोगाच्या बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले की कोविड संकटाच्या काळात भारताची संघराज्य रचना आणि सहकारी संघराज्य संपूर्ण जगासाठी एक मॉडेल म्हणून उदयास आले आहे.

बैठकीत कोण उपस्थित?जुलै 2019 नंतर परिषदेची ही पहिली बैठक आहे, ज्यामध्ये सर्व सहभागी समोरासमोर आले आहेत. गव्हर्निंग कौन्सिल ही NITI आयोगाची सर्वोच्च संस्था आहे आणि त्यात राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे लेफ्टनंट गव्हर्नर आणि अनेक केंद्रीय मंत्री असतात. केंद्रीय मंत्री अमित शहा, नितीन गडकरी, राजनाथ सिंह, एस जयशंकर तसेच उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, हरियाणा, मध्य प्रदेश आणि आसामचे मुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित होते. मात्र, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला. तर, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार प्रकृतीच्या कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत. 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारNIti Ayogनिती आयोग