सरकारी काम आणि वर्षानुवर्षे थांब असं म्हटलं जातं. सरकारी कर्मचारी म्हटलं की ढिलाई ठरलेलीच, असं आपण अनेकदा ऐकतो. अनेकांनी याचा अनुभवदेखील घेतला असेल. अशाच अधिकाऱ्यांना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयासोबतच सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग (एमएसएमई) मंत्रालयाची जबाबदारी सांभाळणाऱ्या नितीन गडकरींनी (Nitin Gadkari) चांगलंच फैलावर घेतलं. एमएसएमई विभागाच्या एका कार्यक्रमात सहभागी झालेल्या गडकरींना सरकारी अधिकाऱ्यांच्या ढिलाईचा अनुभव आला. त्यामुळे नाराज झालेल्या गडकरींनी अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. (Nitin Gadkari angry over government officials)नितीन गडकरी स्वत: कोणती कार वापरतात? डिझेल की ईलेक्ट्रीक...बुधवारी एमएसएमई विभागाच्या तंत्रज्ञान केंद्राचं उद्घाटन होतं. त्यामध्ये नितीन गडकरी सहभागी झाले होते. या कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून अनेक अधिकारीदेखील हजर होते. अधिकाऱ्यांच्या कामाची शैली पाहून नाराज झालेल्या गडकरींनी त्यांना पगाराची आठवण करून दिली. यावेळी गडकरींनी अधिकाऱ्यांना गाय-म्हशीचं उदाहरण दिलं. 'आपण गायी-म्हशी पाळतो. त्यांनी जास्त दूध द्यावं यासाठी त्यांना चांगला आहार देतो. पण चांगला आहार खायला घालूनसुद्धा दूधच मिळत नसेल, तर मग अशा जनावरांचा काय उपयोग?,' असा सवाल गडकरींनी उपस्थित केला....तर नव्या कारवर मिळणार ५ टक्के घसघशीत डिस्काऊंट; नितीन गडकरींची मोठी घोषणासरकारी अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीमुळे संतापलेल्या गडकरींनी पुढे बोलताना अधिकाऱ्यांच्या आवश्यकतेवरच बोट ठेवलं. 'सरकारनं तुम्हाला फुकट पगार द्यायचा का? इतक्या अधिकाऱ्यांची, त्यांच्यावर गुंतवणूक करण्याची गरजच काय?,' असे प्रश्न गडकरींनी उपस्थित केले.सरकारी अधिकाऱ्यांच्या कार्यशैली आणि कार्यक्षमतेवर याआधीही नितीन गडकरींनी नाराजी आणि संताप व्यक्त केला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एनएचएआयच्या इमारतीचं उद्घाटन झालं. त्या कार्यक्रमाला गडकरी उपस्थित होते. त्यावेळीही गडकरींनी संताप व्यक्त केला होता. काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी-१ सरकारच्या कार्यकाळात मंजूर झालेल्या इमारतीचं काम भाजप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी-२ सरकारच्या काळात पूर्ण झालं. त्यावर काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांचे फोटो अशा कार्यालयांमध्ये लावायला हवेत, असं गडकरी म्हणाले होते.
सरकार फुकट पगार द्यायला बसलंय का?; गडकरी सरकारी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढतात तेव्हा...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 3:44 PM