विकास झाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : आतापर्यंत देशातील रस्त्याच्या पृष्ठभागावर प्लास्टिक कचरा वापरून ७०३ किमी लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात आले आहेत, अशी माहिती रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्रीनितीन गडकरी यांनी दिली. राज्यसभेत डॉ. विकास महात्मे यांनी त्रिपुरा राज्याच्या उदाहरणाचे अनुसरण करून मोठ्या प्रमाणावर रस्ते बांधणीत प्लास्टिक कचरा वापरण्याची सरकारची योजना आहे का? असा प्रश्न विचारला होता.
ओबीसींच्या सर्व जातींची संख्या पुढे यावी - खा. रामदास तडस
ओबीसीअंतर्गत येणाऱ्या सर्व जातींची संख्या विस्तृत रूपाने समोर येण्यासाठी ओबीसी वर्गाचा समावेश भारताच्या जनगणना २०२१ अनुसूचीच्या अंतर्गत करावा, अशी मागणी भाजपचे सदस्य रामदास तडस यांनी लोकसभेत केली. तडस यांनी सांगितले की, भारताच्या जनगणनेत २०२१ अनुसूचीच्या ओळ क्रमांक १३ अंतर्गत करण्याची आवश्यकता आहे.
कोरोनाचे नेमके बळी किती? – राऊत
केंद्र सरकार कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या का लपवत आहे? नेमके किती लोक मरण पावले आहेत याची माहिती आम्हाला मिळायला हवी. कोरोनामुळे जास्त लोक मरण पावल्याचे काही अहवाल आहेत. केंद्र सरकारने सत्य माहिती द्यावी याकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लक्ष वेधले.