नवी दिल्ली : देशातील पायाभूत सुविधांमध्ये रस्ते, महामार्गाची सर्वांत महत्त्वाची भूमिका असते. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या विभागाचे कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प देशभरात सुरू आहे. केंद्र सरकार आता ग्रीन एक्सप्रेसकडे (Green Express Highways) मोर्चा वळवत आहे. यासाठी नितीन गडकरी मेगा प्लान आखत असल्याची माहिती मिळाली आहे. पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्सने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी याबाबतची माहिती दिली. (nitin gadkari make mega plan for green express highways and said govt will spend 7 lakh crore)
पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्सने दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी डिजिटल पद्धतीने सहभाग नोंदवला. यावेळी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रीन एक्सप्रेस हायवेच्या बांधकामावर सरकार ७ लाख कोटी रुपये खर्च करणार आहे, अशी माहिती गडकरी यांनी दिली.
ठाकरे सरकारमध्ये आणखी किती सचिन वाझे दडले आहेत?; भाजपचा सवाल
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे वर्षभरात
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग पुढील वर्षभरात पूर्ण होईल. या प्रकल्पासाठी एक लाख कोटी रुपये खर्च आला असून, त्याचबरोबर दिल्ली-मेरठ एक्सप्रेस वेचे उद्घाटन एक ते दोन महिन्यांत होईल. ग्रीन हायवेच्या बांधकामामुळे देशातील वायू प्रदूषण कमी होण्यास, रहदारी सुलभ होण्यास आणि लॉजिस्टिक्स तसेच वाहतुकीचा खर्च कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.
पर्यावरणाला हानी न पोहोचवता विकास
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाइपलाइन अंतर्गत १११ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूकीचे लक्ष्य ठेवले असून, हरित दृष्टीकोन स्वीकारत पर्यावरणाला हानी न पोहोचवता विकास करण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात येत आहे. २२ ग्रीन हायवे कॉरिडोरपैकी दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर दोन महानगरांदरम्यान वाहनाने प्रवास करण्याचा वेळ कमी केला जाईल. हा प्रवास १२ तासांत होऊ शकेल. आताच्या घडीला या प्रवासाला ४० तास लागतात, असेही गडकरी म्हणाले.
साडी नव्हे, बरमुडा घाला; ममता बॅनर्जींवर टीका करताना भाजप नेत्याची जीभ घसरली
दरम्यान, दिल्ली-अमृतसर-कटरा प्रकल्पाचे काम दोन ते तीन महिन्यांत सुरू होईल. दिल्ली-फरीदाबाद-सोहना एक्सप्रेस महामार्ग आणि अहमदाबाद-ढोलेरा महामार्ग प्रकल्प सादर करण्यात आला आहे, असे गडकरी यांनी यावेळी बोलताना नमूद केले.