नागपूर : भाजपा मजबूत झाल्यामुळे कमजोर विरोधक एकत्र येत आहेत. एकमेकांकडे न पाहणारे आता हातात हात घालून उंचावत आहे. भाजपाने त्यांच्यात प्रेम निर्माण केले आहे. हे पोटनिवडणुकीत एकत्र आले असले तरी मुख्य निवडणुकीत तिकीट वाटपावरून यांचा पोळा फुटेल, असा नेम केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी विरोधकांवर साधला. विकासाच्या मुद्यावर आम्ही सर्वांशी ताकदीने लढू, असे आव्हानही त्यांनी दिले.गेल्या चार वर्षात केंद्र सरकारच्या कामाचा लेखाजोखा गडकरी यांनी शनिवारी प्रसार माध्यमांसमोर मांडला. गडकरी म्हणाले, देशाने नेहरू-गांधी कुटुंबाला ४८ वर्षे राज्य करू दिले. भाजपाला आता ४८ महिने मिळाले आहेत. देशात जातीयवाद व सांप्रदायिकता पसरविण्याचे राजकारण सुरू आहे. आम्ही संविधान बदलत आहोत, अशी भीती दाखवून दलितांना दुरावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुस्लिमांच्या मनात असुरक्षितता पसरविण्याचे काम सुरू आहे. काही घटक जातीत संघर्ष लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, २०१४ पासूनचा क्रम पाहता आता पंजाब वगळता काँग्रेस कुठे आहे? काँग्रेस एक प्रादेशिक पक्ष झाला आहे. एकट्या आपल्या विभागाने देशात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष दोन कोटी रोजगार देण्याचे काम केले आहे. पण विरोधकांचा अपप्रचारावरच भर आहे. कर्नाटकच्या निवडणुकीत राहुल गांधी हे जेडीएसही भाजपाची बी टीम असल्याचे सांगत होते. आता त्या बी टीमशी कसे काय सरकार स्थापन करीत आहेत, असा सवाल त्यांनी केला. या वेळी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.मोदीच पंतप्रधानपंतप्रधान पदासाठी तुमचे पुढे येऊ शकते का, यावर गडकरी म्हणाले, भाजपाला पूर्ण बहुमत मिळेल व नरेंद्र मोदी हेच आमचे पंतप्रधान बनतील.
जागा वाटपावरून विरोधकांचा पोळा फुटेल - नितीन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 11:54 PM