नवी दिल्ली : विकास कामांच्या फाईल दाबून ठेवणाºया अधिकाºयांवर कारवाई करून घरचा रस्ता दाखविण्यात येईल, असा इशारा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे.
रस्ते सुरक्षेशी संबंधित स्वयंसेवी संस्थांच्या बैठकीत प्रमुख पाहुणे म्हणून गडकरी बोलत होते. यावेळी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंग उपस्थित होते. गडकरी म्हणाले की, विकास कामे व नव्या रस्त्यांच्या फाईल दाबून ठेवणारे काही अधिकारी असतात. ते स्वत: काम करीत नाहीत व दुसºयांनाही काम करू देत नाहीत. ही लालफीतशाही सहन करणार नाही.
भारतात दहशतवादाच्या हल्ल्यांपेक्षा रस्ते अपघातात मरण पावलेल्यांची संख्या जास्त आहे. ही स्थिती अत्यंत दुर्भाग्यपूर्ण व वेदनादायी आहे, असे सांगून गडकरी म्हणाले की, अनेक उपाय करूनही भारतात रस्ते अपघातात मरण पावणाºयांची संख्या जगात सर्वाधिक आहे. यात मरण पावणाºया व्यक्ती १८ ते ३५ या वयोगटातील सर्वाधिक असतात.रोज ३0 कि.मी.चे रस्तेगडकरी म्हणाले, या वर्षापासून भारतात दररोज ३० किलोमीटर रस्ते तयार होतील, काम न करणाºया अधिकाºयांवर काय कारवाई केली, अशी विचारणा पंतप्रधानांनी केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंग म्हणाले, भारताने चंद्र व मंगळावर स्वारी केली आहे; परंतु देशातील रस्ते वाहतूक मात्र सुरक्षित करू शकलो नाही. ही खेदाची बाब आहे.