Nitin Gadkari: नेपाल-चीन मार्गाची गरज नाही, आता भारतातून थेट 'कैलास मानसरोवर' दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 11:11 AM2022-03-23T11:11:13+5:302022-03-23T11:14:12+5:30

उत्तराखंड मार्गाद्वारे होणाऱ्या प्रवासामुळे केवळ वेळेचीच बचत होणार नाही, तर सध्याच्या प्रवाशांसाठी एक सहज आणि सुलभ रस्तेमार्गही निश्चित करण्यात येत आहे

Nitin Gadkari: There is no need for Nepal-China route, now directly from India to Kailash Mansarovar | Nitin Gadkari: नेपाल-चीन मार्गाची गरज नाही, आता भारतातून थेट 'कैलास मानसरोवर' दर्शन

Nitin Gadkari: नेपाल-चीन मार्गाची गरज नाही, आता भारतातून थेट 'कैलास मानसरोवर' दर्शन

Next

नवी दिल्ली - केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी संसदेत भाषण करताना कैलाश मानसरोवरचा उल्लेख केला. सन 2023 पर्यंत भारतीय नागरिक चीन किंवा नेपाळला न जाता कैलास मानसरोवरला जाऊन दर्शन घेऊ शकतील. उत्तराखंडच्या पिथौरागड येथून एक मार्ग बनविण्यात येत असून तो थेट कैलास मानसरोवरला पोहचणार आहे, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्रीनितीन गडकरी यांनी संसदेत बोलताना सांगितलं. 

उत्तराखंड मार्गाद्वारे होणाऱ्या प्रवासामुळे केवळ वेळेचीच बचत होणार नाही, तर सध्याच्या प्रवाशांसाठी एक सहज आणि सुलभ रस्तेमार्गही निश्चित करण्यात येत आहे. सध्या वाहतूक मंत्रालयाद्वारे जम्मू आणि काश्मीरमध्ये रस्ते संपर्क वाढविण्यात येत आहे. त्यामुळे, मुंबई, दिल्ली आणि श्रीनगर येथे प्रवास करताना वेळेची मोठी बचत होईल. या सर्व योजनांसाठी 7 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचेही नितीन गडकरींनी संसदेत खासदारांना माहिती देताना सांगितले.

कैलास मानसरोवर यात्रा ही हिंदूंसह बौद्ध आणि जैन धर्मीयांसाठीही धार्मिक महत्व असलेली यात्रादर्शन आहे. त्यामुळे, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी खासदार प्रतिनिधींसह जोजिला टनल या भोगद्याला पाहण्यासाठी भेट द्यावी, असा आग्रहही गडकरी यांनी केला आहे. तसेच, मनाली इथं अटल बोगदा बनवण्यात आला आहे. सुरूवातीला साडे तीन तास प्रवास करायला लागत होता. आता केवळ ८ मिनिटांत प्रवास होत आहे. लडाख लेहहून थेट कारगील, कारगील ते झेरमर आणि झेरमरहून श्रीनगर मोठे महामार्ग बनत आहेत, अशी माहितीही गडकरींनी दिली. 

श्रीनगर ते मुंबई अवघ्या 20 तासांत

केंद्रीय रस्ते व महामार्ग निर्माण मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी संसदेत देशाच्या रस्त्यांचा रोडमॅप समोर ठेवला. येत्या २०२४ पर्यंत देशाचे रस्ते अमेरिकेसारखे करण्यात येतील. यावर्षी डिसेंबरपर्यंत दिल्लीपासून अनेक शहरं २ तासांच्या अंतरावर असतील. त्याचसोबत श्रीनगर ते मुंबई हे अंतर २० तासांत पार करता येईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोदी सरकारच्या काळात देशभरात रस्त्यांचे जाळे विणले. विविध महामार्ग, उड्डाणपूल बांधले. संसदेत गडकरींनी नेमकं काय काय सांगितले ते जाणून घेऊया.
 

Web Title: Nitin Gadkari: There is no need for Nepal-China route, now directly from India to Kailash Mansarovar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.