शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

Road Safetyसाठी नितीन गडकरींनी घेतला मोठा निर्णय, या सर्व कारमध्ये ६ एअरबॅग अनिवार्य 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 8:57 PM

Road Safety: रोड सेफ्टीला अधिक चांगले बनवण्यासाठी केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे रस्त्यावरून धावणाऱ्या प्रत्येक कारमध्ये प्रवाशांना अतिरिक्त सुरक्षा मिळणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री Nitin Gadkari यांनी ट्विटरवरून याची माहिती दिली आहे.

नवी दिल्ली - रोड सेफ्टीला अधिक चांगले बनवण्यासाठी केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे रस्त्यावरून धावणाऱ्या प्रत्येक कारमध्ये प्रवाशांना अतिरिक्त सुरक्षा मिळणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरवरून याची माहिती दिली आहे.  रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करन सांगितले की, कारमध्ये ६ एअरबॅग असणे अनिवार्य करण्यासाठी अध्यादेशाच्या मसुद्याला मंजुरी दिली आहे. त्यामुळे सर्व विभागातील कारमधील पॅसेंजरची सुरक्षा सुनिश्चित होणार आहे. कारची किंमत आणि प्रकाराचा त्याच्याशी काहीही संबंध नाही.

गडकरी यांनी सांगितले की, हा निर्णय एम१ कॅटॅगरीमधील कारसाठी घेण्यात आला आहे. एम१ कॅटॅगरीमध्ये ५ ते ८ सिटर कारचा समावेश आहे. अशाप्रकारे मिड-रेंजच्या सर्व कारमध्ये ६ एअरबॅग असणे अनिवार्य असेल. या नव्या निर्णयानंतर कारमध्ये दोन साइड एअरबॅग आणि दोन साईड कार्टेनसुद्धा लागतील. त्यामुळे कारमध्ये मागे बसलेल्या प्रवाशांसाठीसुद्धा सुरक्षा सुनिश्चित होणार आहे.

केंद्र सरकारने यापूर्वी पहिल्या ड्रायव्हर सिटसाठी एअरबॅन अनिवार्य केलं होतं. यावर्षी १ जानेवारी २०२२पासून सर्व कारमध्ये ड्रायव्हरसह को-पॅसेंजरच्या सुरक्षेसाठी प्रत्येक कारमध्ये दोन एअरबॅग अनिवार्य करण्यात आल्या आहेत. सरकारच्या या निर्णयानंतर निश्चितपणे कार कंपन्यांचा खर्च वाढणारा आहे. एक एअरबॅगची किंमत १८०० ते २००० रुपयांच्या दरम्यान आहे. अशा परिस्थितीत ६ एअरबॅग लावण्यासाठी एकूण १० ते १२ हजार रुपये खर्च होणार आहे. मात्र केंद्र सरकारच्या मते एअर बॅगची मागणी वाढल्याने याची किंमत कमी होणार आहे.

रस्ते दुर्घटनेमध्ये जीव गमावणाऱ्यांमध्ये भारत जगातील आघाडीच्या देशांपैकी एक आहे. नितीन गडकरी वेगवेगळ्या मंचावरून यामध्ये घट करण्यासाठी मत मांडत असतात. आता सरकारच्या या पावलाकडे त्याचाच एक भाग म्हणून पाहिले जात आहे. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाcarकारNitin Gadkariनितीन गडकरी