जैन इरिगेशनच्या सौरऊर्जा संशोधन प्रकल्पाला नितीन गडकरी यांची भेट
By admin | Published: January 26, 2016 12:04 AM
सौर कृषि पंपाच्या प्रसारासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन- नितीन गडकरी
सौर कृषि पंपाच्या प्रसारासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन- नितीन गडकरीजळगाव- भविष्यातील ऊर्जेची गरज लक्षात घेता शाश्वत शेतीच्या व शेतकर्यांच्या स्वयंपूर्णतेच्या दृष्टीने सौर कृषि पंपाची उपलब्धी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. उच्च कृषि तंत्रज्ञानासह कृषि क्षेत्राला नवी दिशा देणारे हे तंत्रज्ञान शेतकर्यांपर्यंत पोहोचावे यासाठी जैन इरिगेशन अधिकाधिक योगदान देईल, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. जैन इरिगेशनच्या सौर कृषिपंप गुणवत्ता संशोधन प्रकल्पास व फलोत्पादन संशोधन केंद्रास त्यांनी भेट देऊन सविस्तर माहिती घेतली. यवेळी त्यांच्या समवेत कृषिमंत्री एकनाथराव खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. जैन इरिगेशनतर्फे कंपनीचे उपाध्यक्ष अशोक जैन यांनी त्यांचे स्वागत केले, संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन व सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी त्यांना विविध प्रकल्पांची माहिती दिली.सौर कृषिपंपाच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड न करता हे पंप प्रत्यक्ष शेतीवरही पूर्ण क्षमतेने दीर्घकाल चालावे यासाठी जैन इरिगेशनने भर दिला आहे. भारतातील नैसर्गिक स्थिती लक्षात घेऊन कृषिक्षेत्राच्या गरजेनुरुप यात शेतकर्यांना साध्य करता येतील, असे बदलही यात केले आहेत. जैन इरिगेशनच्या एनर्जी पार्क येथीलसौर कृषिपंपाच्या टेस्टींग लॅबला भेट देऊन गडकरी यांनी समाधान व्यक्त केले.या भेटीत त्यांनी येथील फलोत्पादन प्रात्यक्षिक क्षेत्रावर भेट देऊन अतिघनदाट पेरु व मोसंबी लागवड क्षेत्राची पाहणी केली. जगात प्रथमच जैन इरिगेशनने भारतीय जमिनीत शेतकर्यांना भरघोस पेरुचे उत्पादन होईल असे उतिसंवर्धित पेरुची रोपे विकसित केली आहे. मोसंबी फळांमध्ये जैन इरिगेशनने संशोधनात मैलाचा टप्पा गाठला आहे. कॅप्शन- जैन इरिगेशनच्या सौर कृषि पंपाच्या प्रात्यक्षिक वाहनाचा शुभारंभ करताना नितीन गडकरी. डावीकडून अमर जैन, संजय सावकारे, उन्मेष पाटील, अशोक जैन, अतुुल जैन, एकनाथराव खडसे, भवरलाल जैन, गिरीश महाजन, शिरीष चौधरी, ए.टी.पाटील, चैनसुख संचेती आदी.