शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

Nitin Gadkari YouTube Earning: गडकरींनी ‘बिग बीं’ना दिला ‘गुरुमंत्र’, जाणून घ्या युट्यूबमधून किती होती केंद्रीय मंत्र्यांची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 8:24 AM

गडकरी आपल्या कमाईतील एक भाग गरीबांसाठी देतात.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे अनेकदा चर्चादरम्यान किंवा मंचावरून अनेक किस्से सांगत असतात. बोलता बोलताच ते अगदी सहजपणे गोष्टी लोकांसोबत शेअरही करत असतात. त्यांचे अनेक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरलही होतात. Youtube वरही नितीन गडकरी यांचे ४ लाख ६१ हजार सबस्क्रायबर्स आहेत. युट्युबवरूनही गडकरी दर महिन्याला भरपूर कमाई करतात.

आपल्या भाषणाचे व्हिडीओ आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केले जातात. त्या व्हिडीओंना चांगले व्ह्यूजही येत असतात, अशी माहिती खुद्द नितीन गडकरी यांनी इंडियन एक्स्प्रेसच्या अड्डा या कार्यक्रमान दिली. दरम्यान, युट्यूबकडून दर महिन्याला आपल्याला जवळपास तीन लाख रुपये मिळतात, असं गडकरींनी सांगितलं.

प्रामाणिकपणे कमवा, शॉर्टकटमधून कोणताही लाभ नाही, हा माझा मूलमंत्र आहे, असं त्यांनी सांगितलं. पैसा जीवनाचं साधन आहे, पण साध्य असू शकत नाही. देवानं मला जितकं आणि जे काही दिलंय त्यात मी खूप खूष आहे, असंही गडकरी म्हणाले.

आरोग्य महत्त्वाचंआपल्या फिटनेस आणि दिनचर्येचा संदर्भ देत नितीन गडकरी म्हणतात, की “आरोग्यापेक्षा काहीही महत्त्वाचे नाही. प्रत्येकाने आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. तुमची तब्येत ठीक नसेल तर तुम्ही मर्सिडीज कार आणि इतर सुविधांचं काय करणार?” दरम्यान, नितीन गडकरींनी त्यांचे वजन १३५ किलोवरून ८४ किलोपर्यंत कमी केले आहे. नियमित योगासने आणि प्राणायाम केल्यामुळे हे शक्य झाले आहे.

वजन कमी केल्यानंतर एके दिवशी ते अमिताभ बच्चन यांना भेटले. त्यांना पाहून अमिताभ बच्चन अवाक् झाले आणि त्यांनी गडकरींना विचारले, तुम्ही काय केले? तुम्ही १० वर्षांनी लहान दिसत आहात. त्यानंतर मी त्यांना सर्व व्यायाम, योगासने आणि प्राणायामही शिकवलं, असं गडकरींनी एका मुलाखतीदरम्यान सांगितलं.

कमाईतील एक भाग गरीबांसाठी“दुनिया नें हमको दिया क्या, दुनिया से हमनें लिया क्या? हे गाणं मला फार आवडतं. मी हिच फिलॉसॉफी फॉलो करतो, चांगले राहा आणि चांगलं काम करत राहा. माझ्या कमाईतील एक भाग मी गरीबांना देतो आणि माझ्या कुटुंबीयांनाही हे सांगितलं आहे,” असं गडकरी म्हणाले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीAmitabh Bachchanअमिताभ बच्चनYouTubeयु ट्यूब