केंद्रीय वाहतुक मंत्री नितीन गडकरी आपल्या कामाच्या पद्धतीमुळे नेहमी चर्चेत असतात. रस्त्यांच्या कामामुळे ते सतत चर्चेत असतात. गेल्या काही दिवसापासून त्यांनी टोल टॅक्स संदर्भातही मोठे निर्णय घेतले आहेत. गेल्या वर्षीपासून देशभरात टोल भरण्यासाठी फास्टटॅगचा वापर सुरू केला आहे. आता पुन्हा टोल टॅक्स मध्ये बदल करण्यात आला आहे.
महामार्गावरुन दररोज प्रवास करणाऱ्यांना टोल भरावा लागतो. आता केंद्र सरकार टॅक्सच्या नियमात बदल करणार आहे. टोल टॅक्स संदर्भात एक विधेयक मांडले जाणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली आहे.
नद्यांतून सर्वाधिक लांब सफरीवर ‘गंगा विलास क्रूझ’, ५० दिवसांत गाठणार चार हजार किमीचा पल्ला
टोल टॅक्स न भरणाऱ्यांसाठी कोणत्याही शिक्षेची तरतुद नाही. तर आता टोल भरण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.
"आतापर्यंत टोल न भरल्यास शिक्षेची तरतूद नाही, मात्र टोलबाबत विधेयक आणण्याची तयारी सुरू आहे. आता थेट तुमच्या बँक खात्यातून टोल टॅक्स कापला जाईल. त्यासाठी पद्धत सुरू केली जाणार नाही, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली.
"आता तुम्हाला टोल टॅक्स भरावा लागणार नाही, थेट तुमच्या खात्यातून रक्कम कापली जाईल, असं नितीन गडकरी म्हणाले. '2019 मध्ये आम्ही एक नियम केला होता की, कार कंपनीने फिट केलेल्या नंबर प्लेटसह येतील. त्यामुळे गेल्या चार वर्षांत आलेल्या वाहनांवर वेगवेगळ्या नंबरप्लेट असतात. 2024 पूर्वी देशात 26 मोठे महामार्ग तयार होतील आणि भारत रस्त्यांच्या बाबतीत अमेरिकेच्या बरोबरीने असेल. यासोबतच आगामी काळात टोल कर वसुलीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यावरही भर देण्यात येणार असल्याचे नितीन गडकरी म्हणाले.
सध्या एखाद्या व्यक्तीने 10 किमीचे अंतर कापल्यास त्याला 75 किमीचे शुल्क भरावे लागते, परंतु आता नवीन प्रणालीमध्ये जेवढे अंतर कापले तेवढ्यासाठी शुल्क आकारले जाईल. NHAI ची स्थिती पूर्णपणे ठीक आहे आणि त्यात पैशांची कमतरता नाही, असंही गडकरी म्हणाले.